Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : कासदाह आजारावर घरच्याघरी उपचार कसे कराल?

कासदाह हा दुधाळ जनावरांच्या कासेला होणारा घातक आजार आहे. जनावरांचे सड किंवा कास खराब झाल्यास जनावरांची उत्पादकता कमी होते.

Team Agrowon

कासदाह (Mastitis) हा दुधाळ जनावरांच्या कासेला होणारा घातक आजार आहे. जनावरांचे सड किंवा कास खराब झाल्यास जनावरांची उत्पादकता कमी होते. परिणामी अशा जनावरांचे बाजारमुल्यही कमी होते. त्यासाठी आजाराची लक्षणे ओळखून त्वरित उपचार करणे गरजेचे असते. गुजरात येथील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने कासदाह आजारावर नैसर्गीक उपचारांची शिफारस केली आहे. ही औषधे घरात सहज उपलब्ध होणारे जीन्नस वापरुन कमी खर्चात तयार करता येतात.

मोठी कास असणाऱ्या तसेच संकरित जनावरांमध्ये कास दाह होण्याचे प्रमाण जास्त असते. वाढत्या वयाची जनावरे म्हणजे तिसऱ्या- चौथ्या वेतातील जनावरांमध्येही कासदाहाचे प्रमाण जास्त असते. जनावरे बसण्याची आणि सभोवतालच्या जागेची अस्वच्छता. धार काढणाऱ्या व्यक्तीची अस्वच्छता. दूध पूर्ण न काढले गेल्यामुळे. कासेला जखम झालेली असणे इ. कारणांमुळे दुभत्या जनावरांमध्ये कासदाह आजार होतो.

औषध कसे तयार करायचे?

कोरफड, हळद, चुना आणि लिंबू वापरुन हे औषध तयार होते. यामध्ये २५० ग्रॅम कोरफड, ५० ग्रॅम हळद, १५ ग्रॅम चुना एकत्र मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करावी.

वापरण्याची पद्धत

मुठभर पेस्टमध्ये १५० ते २०० मिली पाणी घालून पातळ मिश्रण तयार करावे.

जनावराची कास स्वच्छ धुऊन तयार केलेले मिश्रण पूर्ण सडावर लावावे. हे मिश्रण दिवसातून १० वेळा सलग पाच दिवस लावावे.

२ लिंबाचे काप दिवसातून दोन वेळा सलग तीन दिवस चारावे.

दुधामध्ये रक्त किंवा लालसरपणा असेल तर वरील मिश्रणामध्ये दोन मुठी कडीपत्ता व गुळ याची पेस्ट दिवसातून दोनवेळा चारावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कमीच राहणार

Manmad APMC : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतराच्या हालचाली

Humani Pest Outbreak : मानोरा तालुक्यात हुमणी अळीचा प्रकोप

Farmer Loan Waiver : व्याजमाफी करून मुदलाचे हप्ते करून द्या

Agriculture Solar Pump : सोलरही नाही अन् पैसेही परत मिळेना

SCROLL FOR NEXT