Sub clinical Mastitis in Dairy Cows
Sub clinical Mastitis in Dairy Cows

कासदाह आजारावरील प्रतिबंधात्मक उपाय

आपल्या गोठ्यात पशुधनाचे संगोपन करत असताना, फक्त व्यवस्थापकीय चुकांमुळे जनावरे कासेचा दाह या आजाराला बळी पडताना दिसतात. सर्वात खर्चिक मानवनिर्मित असा हा आजार आहे. सर्व आजारात 'उपचारापेक्षा प्रतिबंध बरा' ही युक्ती कामी येते, तसाच प्रकार या आजाराबाबतही आहे.
Published on

आपल्या गोठ्यात पशुधनाचे संगोपन करत असताना, फक्त व्यवस्थापकीय चुकांमुळे जनावरे कासेचा दाह या आजाराला बळी पडताना दिसतात. सर्वात खर्चिक मानवनिर्मित असा हा आजार आहे.  सर्व आजारात 'उपचारापेक्षा प्रतिबंध बरा' (Prevention is better than cure) ही युक्ती कामी येते, तसाच प्रकार या आजाराबाबतही आहे.

तुमच्या गोठ्यातील जनावरांची धार तर तुम्ही काढली असेलच न? कोणत्याही दुधाळ जनावरांची धार काढल्यानंतर त्यांच्या सडाची छिद्रे ही ३० ते ४५ मिनिटे उघडी म्हणजे ओपन राहत असतात. अशा अवस्थेत जर जनावर खाली बसले तर, या उघड्या छिद्रातून जीवाणू (bacteria) कासेत  (udder) प्रवेश करतात. सुरुवातीच्या अवस्थेत दगडी कासेची कोणतीही लक्षणे दिसत नाही, याला आपण सब क्लिनिकल मस्टायटीस (sub clinical mastitis)म्हणजे सुप्त अवस्थेतील कासदाह असे म्हणतो.

हेही पाहा-  दुधाळ जनावरांमधील कास दाहाची कारणे, लक्षणे आणि उपचार

हा आजार होऊ नये म्हणून सर्व प्रथम धार काढल्यानंतर (milking)  जनावर कमीत कमी अर्धा तास खाली बसता कामा नये. म्हणून धार काढल्यानंतर त्यांना एक बादलीभर स्वच्छ, निर्जंतुक पाणी पिण्यास द्यावे. चारा खाण्यास द्यावा.

जनावर बसण्याची जागा नेहमी कोरडी असावी. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या टीट डीप (teat dip) चा वापर केल्यास अधिक प्रभावी ठरू शकतो. यात धार काढल्यानंतर सड या टीट डीप मध्ये बुडवून घ्यावीत. म्हणजे सडाच्या छिद्र कव्हर होऊन जातील आणि पशुपालक आजाराचा धोका टाळून अवाजवी खर्च टाळू शकतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com