Livestock shelter management during storm Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock in Rain: गारपीट आणि वादळी पावसात जनावरांची काळजी कशी घ्यावी?

Animal Shelter: राज्यात गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज असल्याने जनावरांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेवर नियोजन आणि काही सोपे उपाय केल्यास पशुधनाचे नुकसान टाळता येते.

Swarali Pawar

Farm Weather Precautions: राज्यात सध्या गारपिटीचा अंदाज आहे तर अनेक भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जनावरांची काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. गोठ्याचे व्यवस्थापन, जनावरांचे योग्य नियोजन करुन शेतकरी वातावरण बदलापासून जनावरांची काळजी घेऊ शकतात. ही माहिती लातूरच्या रेणापूर येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. जी. एस. निटुरे यांनी दिली आहे.

घ्यावयाची काळजी

शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाच्या अंदाजाबद्दल कायम सतर्क राहणे गरजेचे आहे. रोजच्या रोज हवामानाचा अंदाज घेऊन आणि त्यानुसार बैल, गायांना, शेळ्या- मेंढ्यांना आणि इतर जनावरांना झाडांखाली बांधू नयेत. तसेच त्यांना मोकळे सोडणे टाळावे. पावसाच्या इशाऱ्याचा मेसेज येताच चरायला सोडलेल्या जनावरांना घरी आणावे.

वादळी वाऱ्यासह पाऊस असल्यावर बऱ्याचदा शेडवरचे पत्रे उडून जातात. त्यामुळे जनावरांना लवकरात लवकर भक्कम शेडमध्ये, निवाऱ्याखाली आणावे.

तसेच पावसाचे पाणी गोठ्याच्या आत येऊ नये, यासाठी ताडपत्रीचे पडदे बाजूने लावावे. त्यामुळे पाणी आत येऊन गोठा ओला होणार नाही.

उन्हाळ्यात जनावरांना भरपूर पाणी पाजावे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी तीनही वेळाला पाणी पाजावे. जनावरांना चरण्यासाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सोडू नये.

गोठ्याची स्वच्छता

गोठा स्वच्छ व कोरडा राहण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते. गोठा कोरडा राहण्यासाठी कुटारात चुन्याची पावडर मिसळून त्याचा पातळ थर पसरावा. त्यामुळे आर्द्रता कमी होईल. तसेच पावसाने साचलेले पाणी बाहेर काढून टाकावे.

पाऊस नसताना गोठ्यात भरपूर हवा व सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्यावी.

अचानक येणाऱ्या पावसामुळे बाह्य व आंतरपरजीवी जंतूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. जसे गोचीड, गोमाश्या, मच्छर, डास, चिलटे यांच्या चाव्यामुळे जनावरांना विविध आजार होतात. त्यासाठी शिफारशीप्रमाणे कीटकनाशकांची फवारणी करुन करावी.

पाऊस झाल्यानंतर दुधाळ जनावरांचे दूध काढण्याआधी आणि काढल्यानंतर कास पोटॅशिअम पर्मंग्नेटच्या द्रावणाने स्वच्छ निर्जंतुक करून घ्यावी. जेणेकरून गोठ्यातील अस्वच्छतेमुळे जंतूसंसर्ग होऊन कासदाह आजाराचा धोका टाळला जाईल.

लसीकरणे

उन्हाळ्यात दिली जाणारी लाळ्या खुरकूत रोगाची लस जनावरांनी टोचून घ्यावी.

शेळ्या-मेंढ्यामध्ये आंत्रविषार रोगाची प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.

उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आल्याने शेळ्यांमध्ये हगवण, अपचन, पोटफुगी अशा समस्या दिसून येतात. त्यासाठी शेळ्या नदी-नाल्या काठी चरावयास सोडू नयेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Compensation: सातारा जिल्ह्यातील ७८२ शेतकऱ्यांना दिलासा, अवकाळीने झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी मदत मंजूर

Illegal Cotton Seeds: अमरावतीत ८.०५ लाखांचा अवैध बियाण्यांचा साठा जप्त

Fertilizer Shop License Suspension: भंडारा जिल्ह्यातील ३६ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Fertilizer Price: खताची जादा दराने विक्री केल्यास दंडात्मक कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Raghav Chadha: राघव चड्ढांसह 'आप'च्या ७ खासदारांचा 'भाजप'च्या यादीत समावेश, राज्यसभेतील 'एनडीए'चे संख्याबळ १४० पार

SCROLL FOR NEXT