Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : लठ्ठपणामुळे जनावरावर काय परिणाम होतो?

आपल्याला वाटत आपली गाय चांगली धष्टपुष्ठ आहे. मात्र जनावर वरुन दिसायला सशक्त, गोल दिसत असल तरी लठ्ठपणाचा त्याच्या उत्पादन क्षमतेवर, प्रजोत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

Team Agrowon

बऱ्याच शेतकऱ्यांकडे एक किंवा दोनच जनावरे असतात. अशा जनावरांना जास्त प्रमाणात केवळ गहू, मका, ज्वारी भरडून दिली जाते किंवा पीठ जास्त प्रमाणात दिले जाते. त्यामुळे जनावरे अतिलठ्ठ (Fatty Animal) होण्याचे प्रमाण वाढते.

आपल्याला वाटत आपली गाय चांगली धष्टपुष्ठ आहे. मात्र जनावर वरुन दिसायला सशक्त, गोल दिसत असल तरी लठ्ठपणाचा त्याच्या उत्पादन क्षमतेवर, प्रजोत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.

विशेषतः भाकडकाळ व दूध देण्याच्या शेवटच्या काळातील जास्त ऊर्जायुक्त आहारामुळे जनावरांचे अतिपोषण होऊन लठ्ठपणा येतो. याच काळात आहारातील प्रथिनांच्या कमी प्रमाणामुळे ही समस्या अजून वाढते. लठ्ठपणामुळे जनावरावर काय परिणाम होतो तर,

जास्तीचे फॅट जनावर विल्यानंतर यकृताकडे जाते त्यामुळे यकृतामध्ये जास्तीचे फॅट जमा होऊन फॅटी लिव्हर सींड्रोम तयार होतो. त्यामुळे कॅल्शिअमची कमतरता, ॲसिटोनेमीया तसेच विल्यानंतरच्या समस्यांमध्ये वाढ होते. यामध्ये कासदाह सारख्या आजाराचा समावेश होतो.

ज्या गायी गाभणकाळात किंवा वितेवेळी अतिलठ्ठ, जाड असतात त्यांच्यामध्ये विल्यानंतर कॅल्शिअमच्या कमतरतेची लक्षणे अढळतात. अशा प्रकारे उद्भवणाऱ्या कॅल्शिअमच्या कमतरतेमध्ये जनावर उपचारांना लवकर प्रतिसाद देत नाही.

अतिलठ्ठ गायीमध्ये विल्यानंतर जास्त प्रमाणात भूक मंदावल्यामुळे कितनबाधेची लक्षणेसुद्धा उद्भवतात. कितनबाधेवर उपचार करूनही जनावराकडून सहजासहजी प्रतिसाद मिळत नाही.

काही जनावरांमध्ये दूध उत्पादन अचानक कमी होते. गर्भाशयदाह, कासदाह, लंगडणे यांसारख्या समस्याही जास्त प्रमाणात आढळतात.

विल्यानंतर ३ ते ४ आठवड्यांमध्ये जनावराची प्रकृती एकदम खालावते. त्यामुळे जनावरांमध्ये माजावर न येणे, मुका माज यासारख्या समस्याही उद्भवतात; तसेच दूध देण्याचा काळही कमी होतो.

जनावरातील लठ्ठपणा जर टाळायचा असेल तर दूध देण्याच्या शेवटच्या टप्प्यात व भाकडकाळात ऊर्जेचे प्रमाण नियंत्रित करून जनावराला संतुलित पशुखाद्य, आहार द्यावा.

सर्व जनावरांना वयानुसार, दूध उत्पादन काळ, गाभण काळ, भाकडकाळ यानुसार वेगवेगळे गट तयार करून शरीर गरजेनुसार संतुलित आहार दिल्यामुळे जनावरातील लठ्ठपणा टाळता येतो. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT