बऱ्याच पशुपालकांना खनिज मिश्रणाचे (Mineral Mixture) महत्व माहीत नसते, खनिज मिश्रणाच्या कमतरतेमुळे जनावरांची दुग्धोत्पादन आणि प्रजनन क्षमता कमी होते.
खनिज कमतरतेचा परिणाम वासराच्या वाढीवर, मोठ्या जनावरांच्या दुग्धोत्पादनावर (Milk Production) आणि प्रजोत्पादनावर होतो.
खनिजे जनावरांच्या शरीरात तयार होत नसल्याने ती खनिज मिश्रणाद्वारे पुरविणे आवश्यक असते.
जनावरांची शरीरवाढ, शरीरक्रिया, गर्भाची वाढ आणि दुग्धोत्पादनासाठी खनिज मिश्रणाची आवश्यकता असते.
जनावरांना दिल्या जाणाऱ्या खाद्यातून त्यांची पिष्टमय पदार्थ, प्रथिने, कर्बोदके, क्षार आणि जीवनसत्त्वे यांसारख्या पोषणमुल्यांची गरज भागविली गेली पाहिजे.
यातील काही घटकांची कमतरता ही कमी प्रमाणात असते, तर काही जास्त प्रमाणात लागतात. मात्र हे घटक कमी-जास्त प्रमाणात न मिळाल्यास कमतरतेचे परिणाम दिसू लागतात.
यातील काही घटक दुग्धोत्पादनासाठी तसेच प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी उपयोगाचे असतात.
आयोडीन कमतरतेमुळे जनावरांवर होणारे परिणाम
जनावरांच्या शरीरातील गर्भाची वाढ व शारीरिक क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी त्यांना आयोडीनची आवश्यकता असते.
आयोडीनच्या कमतरतेमुळे गायी– म्हशींच्या स्त्रीबीजांडामध्ये विकृती तयार होते.
जनावरांची बीजांडेही अकार्यक्षम होऊ शकतात.
व्यायल्यानंतर जनावरांमध्ये वार अडकण्याची समस्या दिसून येते.
गायी- म्हशीमध्ये गर्भपाताच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
गाभण काळात आयोडीन कमतरता झाल्यास केस नसलेले वासरू जन्माला येऊ शकते.
वळूमध्ये कमी प्रतीच्या वीर्याची निर्मिती होते.
जनावरांची क्षारांची गरज भरून काढण्यासाठी आहारातून खनिज मिश्रणाचा पुरवठा करावा लागतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.