Animal Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : जनावरांमध्ये अखाद्य वस्तूंमुळे होणारे अपाय

Animal Harm : जनावरांना आहारातून योग्य पोषणमूल्याचा पुरवठा होत नसल्यास, जनावरे चरायला सोडल्यावर मिळेल त्या अखाद्य गोष्टी खाऊ लागतात. त्यामुळे होणारे अपाय या लेखातुन पाहुयात.

Team Agrowon

डॉ. प्रज्योत दखणे, डॉ. गणेश थोरात

जनावरांना आहारातून योग्य पोषणमूल्याचा पुरवठा होत नसल्यास, जनावरे चरायला सोडल्यावर मिळेल त्या अखाद्य गोष्टी खाऊ लागतात. सामान्यतः गाई, म्हशींमध्ये प्लॅस्टिक खाण्याचे प्रमाण जास्त आहे. परंतु शेळी, मेंढी इतर छोटे रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये याचे प्रमाण कमी आहे. रवंथ न करणाऱ्या जनावरांमध्ये याचे प्रमाण आढळत नाही.

सध्या जनावरांच्या पोटामध्ये प्लॅस्टिक साचणे ही समस्या फार मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहे. आपल्याकडे घरातील उरलेले अन्न, कचरा टाकताना प्लॅस्टिक पिशवीचा वापर केला जातो. यातील पदार्थ खात असताना, जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक पिशवी जाण्याची शक्यता वाढते. पोटात साचलेल्या प्लॅस्टिकमुळे रवंथ करण्यात अडचणी येतात किंवा पोटात तयार झालेला वायू बाहेर पडण्यास अडथळा होतो.

यामुळे पोटफुगी होण्याची शक्यता वाढते. काही वेळेस अखाद्य गोष्टींबरोबर लोखंडी तुकडे, तारा, खिळे या वस्तू पोटात जातात. आतड्यांना जखम होण्याची शक्यता वाढते. प्लॅस्टिक खाल्लेले जनावर ओळखायला अवघड असते. कारण हे प्लॅस्टिक किंवा अखाद्य वस्तू पोटात जाऊन साचून राहतात.

जनावराला त्रास सुरू होतो. रवंथ करताना अडचण येते. पोटात कळा सुरू होतात. जनावर खाद्य खाण्याचे प्रमाण कमी करते. दूध उत्पादनात घट दिसून येते. प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम दिसून येतो. प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही, पाणी पिणे कमी होते, दुग्धोत्पादनामध्ये घट येते.

परिणाम

प्लॅस्टिकच्या विशिष्ट गुणधर्मामुळे ते अन्ननलिकेद्वारे सहज गिळले जाते. प्लॅस्टिक हे न पचणारे न विघटन होणारे असल्यामुळे ते खाल्ल्यावर सरळ कोठी पोटात साठून राहते.

प्लॅस्टिक अल्प प्रमाणात कोठी पोटात असल्यास त्याचे विशेष परिणाम दिसून येत नाहीत, परंतु अधिक प्रमाणात प्लॅस्टिक जमा झाल्यामुळे काही दिवसांनी याचे आरोग्यावर घातक परिणाम दिसून येतात. पोट गच्च होऊन अपचन होते. जाळी पोटातून खरे पोटात जाण्याचा अन्नाचा मार्ग बंद होणे. जठराची हालचाल मंदावते.

प्लॅस्टिकच्या पिशवीमुळे पोटामध्ये वेगवेगळे कप्पे तयार होऊन त्यामध्ये अन्न साठले जाते. त्या साठलेल्या अन्नावर पचनक्रिया होत नाही.

ओटीपोटाच्या हालचालींमुळे साठलेल्या अन्नाचा मोठा गोळा तयार होतो. तो जाळी पोटातून खऱ्या पोटात जाण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण करून बाधित जनावराला मृत्यू होऊ शकतो.

मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पोटात जमा झाल्यामुळे पोटाची आकुंचन क्रिया मंदावते. त्यामुळे पचनक्रियासुद्धा मंदावते, पोटात वायू जमा होऊन अपचन होते.

जठराची गती मंदावल्यामुळे रवंथ क्रिया पूर्णपणे बंद होते. कोठीपोटाची बरीच जागा प्लॅस्टिकने व्यापल्यामुळे

कोठी पोटाला आंबविण्याच्या क्रियेकरिता जागा अपुरी पडते. आंबवण्याच्या क्रियेवर विपरीत परिणाम होतो.

कोठीपोटाच्या सामूमध्ये बदल होतो. पोटाच्या आतील दाब वाढल्यामुळे पोट दुखायला लागते. याचा जनावरांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन त्याची भूक मंदावते.

प्लॅस्टिक खाल्ल्याची लक्षणे

जनावर चारा खात नाही, पाणी पिणे कमी होते.

दुग्धोत्पादनामध्ये घट येते.

जठराची हालचाल तीन मिनिटाला एकापेक्षा कमी होणे.

शेणाचे प्रमाण कमी होणे. वारंवार पोटफुगी होणे.

तपासणी केली असता रक्तावर कुठलाच परिणाम दिसून येत नाही.

शारीरिक तापमान, हृदयाची गती व श्‍वासाच्या गतीवर काही फरक पडत नाही.

उपाययोजना

दुष्परिणाम टाळण्यासाठी सकस, संतुलित आहार द्यावा. जनावरांच्या सभोवतालचा परिसर, गोठा प्लॅस्टिक मुक्त ठेवावा.

उपचार

शस्त्रक्रिया करून खाल्लेले प्लॅस्टिक जनावराच्या कोठीपोटातून बाहेर काढणे हा एकमेव उपचार आहे.

डॉ. प्रज्योत दखणे, ९४२१५४४८२७

(बाह्य रुग्ण विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT