Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease : ‘लम्पी स्कीन’ हद्दपार, प्रतिबंध कायम गो-पालक आर्थिक संकटात

Farmer In Financial Crisis : लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने गुरांच्या बाजारावर प्रतिबंध घातला. हाच प्रतिबंध कायम असल्याने शेतकरी व गो-पालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे प्रतिबंध उठवण्याची मागणी होत आहे.

Team Agrowon

Nagpur News : लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने गुरांच्या बाजारावर प्रतिबंध घातला. आता हा रोग जवळपास हद्दपार झाला आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला. त्यानंतर प्रतिबंध कायम असल्याने शेतकरी व गो-पालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे प्रतिबंध उठवण्याची मागणी होत आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील हिंगणा, पारशिवनी, सावनेर, काटोल, कळमेश्वर, नरखेड, कामठी आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आला. गतवर्षी देशभरासह महाराष्ट्रातही या आजाराने हाहाकार उडाला होता.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधनात्मक उपाययोजना सुरू केल्या. सीमावर्ती भागातून जिल्ह्यात दाखल होणारी जनावरे व अंतर्गत गुरांचे बाजार भरविण्यास बंदी असल्याने एकाही ठिकाणी हा बाजार भरत नाही.

या हंगामातील चणा, गव्हाची पेरणी झाल्यानंतर शेतकरी आपल्या राखणीतील अयोग्य जनावरे विकतात. काही शेतकरी नवीन जनावरे घेतात. ही खरेदी-विक्री गुरांच्या बाजारातून होते. अशा प्रकारचे प्रत्येक तालुक्यात तीन ते चार बाजार असून जिल्ह्यात ३० च्या जवळपास बाजार भरतात. प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून आजारावर नियंत्रण मिळविले. आता बाजार सुरू करण्याची मागणी शेतकऱ्‍यांकडून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT