krushi seva kendra
krushi seva kendra Agrowon

Krishi Seva Kendra Strike : निविष्ठा विक्रेत्यांच्या ‘बंद’ला दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद

Agriculture Input Act : निविष्ठा विक्री संदर्भातील प्रस्तावित कायदे मागे घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रचालकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला शुक्रवारी (ता. ३) दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला.
Published on

Pune News : निविष्ठा विक्री संदर्भातील प्रस्तावित कायदे मागे घेण्यासाठी कृषी सेवा केंद्रचालकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला शुक्रवारी (ता. ३) दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला. या कायद्याच्या विधेयकांची होळी काही भागांमध्ये करण्यात आली.

महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्‌स, सीड्‌स डीलर्स असोसिशनने (माफदा) निविष्ठा कायद्याच्या विरोधात गुरुवारपासून (ता. २) पुकारलेल्या तीन दिवसीय बंदचा शनिवारी (ता. ४) शेवटचा दिवस आहे.

‘माफदा’चे अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी सांगितले की, बंदमध्ये काही ठिकाणी सहकारी संस्था, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, केळी उत्पादक संघदेखील उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत.

krushi seva kendra
Agriculture Input Act : निविष्ठा कायदे हिवाळी अधिवेशनातच

राज्य सरकारने या आंदोलनानंतरही कायदे रद्द न केल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळासमोर हजारो निविष्ठा विक्रेते ठिय्या आंदोलन करतील. त्यानंतरही सरकारला जाग न आल्यास आम्हाला नाइलाजाने बेमुदत बंदची हाक द्यावी लागेल.

krushi seva kendra
Agriculture Input Act : कृषी निविष्ठा कायदे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू

राज्याच्या विविध भागांमधील सर्व निविष्ठा विक्री केंद्रे बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. ऐन रब्बी हंगामाच्या सुरुवातीला निविष्ठा विक्री बंद असल्यामुळे विशेषतः ग्रामीण व डोंगरी भागातील शेतकऱ्यांचे हाल झाले.

बाजार समित्यांमध्ये शेतमालाची विक्री करायची आणि घरी जाताना अत्यावश्यक निविष्ठा विकत घेण्याची शेतकऱ्यांची पद्धत आहे. मराठा आंदोलनामुळे काही भागात एका बाजूला शेतमाल विक्रीत समस्या; तर निविष्ठा विक्रेत्यांच्या बंदमुळे खते, बियाणे व कीडनाशके खरेदीत अडथळे अशा दुहेरी समस्येला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com