Goat Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : ऋतुनिहाय व्यवस्थापन बदलावर भर

Goat Rearing : २०१८ मध्ये राजेंद्र यांनी लष्करातून सेवानिवृत्ती झाल्यानंतर शेळीपालन करण्याचे ठरविले. चार शेळ्यांपासून सुरू केलेला व्यवसाय आज ३६ शेळ्यांपर्यंत पोचला आहे.

विकास जाधव 

Goat Farming Management :

शेतकरी नियोजन

शेळीपालन

शेतकरी : राजेंद्र लक्ष्मण गायकवाड

गाव : चिंचणेर निंब, जि. सातारा

एकूण शेळ्या : ३६

सातारा जिल्ह्यातील चिंचणेर निंब (ता. सातारा) हे सैनिक परंपरा असलेले गाव. गावातील बहुसंख्य युवा भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. येथील राजेंद्र लक्ष्मण गायकवाड हे देखील २००१ मध्ये मराठा बटालियनमध्ये भरती झाले. घरची चार एकर शेती. २०१८ मध्ये राजेंद्र यांनी लष्करातून सेवानिवृत्ती झाल्यानंतर शेळीपालन करण्याचे ठरविले. चार शेळ्यांपासून सुरू केलेला व्यवसाय आज ३६ शेळ्यांपर्यंत पोचला आहे. अशारितीने शेळीपालन व्यवसायामधून आर्थिक प्रगती साधली आहे.

शेळीपालनाचा श्रीगणेशा

आपल्या भागातील वातावरणात शेळीची कोणती जात चांगली वाढते, टिकते यासह शेळ्यांच्या चारा, पाणी आणि आरोग्य व्यवस्थापनाचा संपूर्ण अभ्यास करून आफ्रिकन बोअर शेळी जातीची शेळीपालनास निवड केली. २०२० मध्ये फलटण येथील निंबकर फार्म येथून आफ्रिकन बोअर जातीच्या चार शेळ्यांची खरेदी केली. आज शेडमध्ये सुमारे ३६ शेळ्या आहेत.

संगोपनातील बाबी

शेळ्यांच्या संगोपनासाठी ८० बाय १२ फूट आकाराचे शेड उभारले आहे. त्यात गाभण शेळ्या, पैदाशीचा बोकड, लहान पिले असे स्वतंत्र विभाग तयार केले आहेत.

नवजात पिलांची सुरुवातीचे १५ दिवस विशेष काळजी घेतली जाते. शेळ्यांचे सर्व दूध पिलांना पाजले जाते. फार्ममध्ये जुळ्यांचे प्रमाण अधिक आहे. काही वेळा तिळेही मिळाले आहे.

ऋतुनिहाय शेडमध्ये व्यवस्थापन पद्धतीत आवश्यकतेनुसार योग्य ते बदल केले जातात. त्यामुळे शेळ्यांचे आरोग्य चांगले राहते. उन्हाळ्यात शेडच्या पत्र्यावर पाचट टाकली जाते.

सुरुवातीच्या काळात पैदाशीसाठी अन्य ठिकाणी शेळ्यांना घेऊन जावे लागे. त्यामुळे मागील वर्षी पैदाशीसाठी उच्च गुणवत्तेच्या बोकडाची खरेदी केली.

खाद्य नियोजन

शेळ्यांना हंगामनिहाय हिरव्या आणि सुक्या चाऱ्याचे नियोजन केले जाते. दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी नेपियर, कडवळ, शेवरी, तुती या चारा पिकांची लागवड केली आहे. सोयाबीन भुस्सा, ज्वारी कडबा यांची हंगामनिहाय साठवणूक करून ठेवली जाते.

आरोग्य व्यवस्थापन

शेळीपालनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. वर्षातून तीन वेळा रोगप्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. दर तीन महिन्यांनी जंतनाशक गोळा दिल्या जातात.

विक्री व्यवस्थापन

शेळ्यांच्या विक्रीसाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. त्यामुळे विक्रीसाठी मार्केट मिळविणे अधिक सोपे झाले आहे. थेट विक्री तसेच नगावर जागेवरून विक्री करण्यावर भर दिला जातो. बोकडाला १७ ते २० हजार रुपये, गाभण शेळीला ३५ ते ४० हजार रुपये असे दर मिळतात. सुमारे पंधरा शेळ्यांच्या प्रति बॅचमधून सरासरी दोन ते सव्वा दोन लाख रुपये उत्पन्न मिळते. याशिवाय उपलब्ध लेंडीखताची विक्री केली जाते.

राजेंद्र गायकवाड ९३७०५९८२७७

(शब्दांकन : विकास जाधव)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT