Pune News: राज्यात ढगाळ हवामान आणि उन्हाचा चटका वाढला आहे. उकाड्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. आज (ता. २७) उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. .गुजरात आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, तसेच दक्षिण कर्नाटकमध्ये १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दक्षिण कर्नाटकपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे राज्यात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान झाले होते..Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ.गुरुवारी (ता. २६) राजस्थानच्या अलवार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील सोलापूर आणि तमिळनाडूच्या एरोडे येथे देशातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..विदर्भासह राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. उकाडाही त्रासदायक ठरत आहे. आज (ता. २७) राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ४ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा देखील वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..Maharashtra Weather Update: यंदा उन्हाळा तीव्र, पर्जन्यमान कमी.सरासरी तापमान (अंश से.)विभाग किमान कमालउत्तर महाराष्ट्र ११.३ ३६पश्चिम महाराष्ट्र १४ ३६.६मराठवाडा १६ ३४.१विदर्भ १५ ३६.१कोकण १९.४ ३३.६.गुरुवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)शहर कमाल किमानपुणे निरंक १५.५अहिल्यानगर ३४.८ १६.३धुळे ३४ १२.६जळगाव ३६ १४जेऊर ३६ १४कोल्हापूर ३४.३ १९महाबळेश्वर २८.२ १६.१.Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढणार.मालेगाव ३५.६ १७नाशिक ३३.३ १४.४निफाड ३४.५ ११.३सांगली ३५.७ १७.६सातारा ३५.२ १५.६सोलापूर ३६.६ २१.१सांताक्रूझ ३२.१ १९.५.डहाणू ३२.३ १९.४रत्नागिरी ३३.६ १९.६छत्रपती संभाजीनगर ३३.९ १९.६धाराशिव ३३.६ १७.६परभणी ३४.१ १९.२परभणी (कृषी ३३.६ १६अकोला ३६.१ २०.१अमरावती ३५.८ १८.३.भंडारा ३२ १८बुलडाणा ३२.६ १९.६ब्रह्मपुरी ३६ १७.४चंद्रपूर ३५.२ २१गडचिरोली ३३.२ १७.२.गोंदिया ३२.५ १५नागपूर ३२.५ १६वर्धा ३४ १७.६वाशीम ३४.४ १७.६यवतमाळ ३२.४ १७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.