Babesiosis Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Disease : जनावरांतील बबेसियोसिस आजार

Animal Care : बबेसियोसिस हा आदिजीवजन्य आजार आहे. याचा प्रसार गोचीडमार्फत होतो. हे आदिजीव रक्तातील लाल पेशींचा नाश करतात.

Team Agrowon

डॉ. सिद्दीकी एम.एफ.एम.एफ., एस.आर.शेख

Babesiosis Disease in Animal : बबेसियोसिस हा आदिजीवजन्य आजार आहे. याचा प्रसार गोचीडमार्फत होतो. हे आदिजीव रक्तातील लाल पेशींचा नाश करतात. त्यामुळे लाल पेशीत असणारा हिमोग्लोबिन घटक लघवीवाटे बाहेर टाकला जातो.यालाच हिमोग्लोबिन्युरिया असे म्हणतात.

जनावरांना कॉफीच्या रंगाची लघवी होते. आजारामध्ये जनावरांना तीव्र ताप येतो, डोळे पिवळे पडतात. साधारणतः हा आजार विदेशी गाई, बैल, देशी गाई यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. म्हशी, शेळी, मेंढीमध्ये कमी प्रमाणात आढळून येतो. उष्ण व दमट वातावरण गोचिडासाठी अनुकूल असते. त्यामुळे हा आजार जुलै ते ऑगस्ट महिन्यांत जास्त प्रमाणात आढळून येतो. योग्य वेळी उपचार न केल्यास जनावरे आजारी पडतात.

प्रादुर्भावाची कारणे

हा आजार बबेसिया बायजेमिना आणि बबेसिया बोवीस या आदिजीवांपासून (प्रोटोझुआ) होतो. या आदिजीवांना बाधित जनावराकडून निरोगी जनावराकडे नेण्याचे काम गोचिडामार्फत होते. हे आदिजीव जनावरांच्या शरीरातील रक्ताच्या लाल पेशीचे आवरण तोडून आतमध्ये घुसतात आणि लाल पेशींचा नाश करतात, त्यामुळे लाल पेशीत असणारा हिमोग्लोबिन घटक जनावराच्या लघवीवाटे बाहेर टाकला जातो.

बाधित जनावरावरील गोचिड संक्रमित रक्त पितात. या गोचिडांनी निरोगी जनावरांचा चावा घेतल्याने, निरोगी जनावरात बबेसियोसिस हा आजाराचा प्रसार होतो.

लक्षणे

जनावरांना अचानक १०५ ते १०६ अंश फॅरेनहाइटपर्यंत ताप येतो. बाधित जनावराला कॉफी रंगाची लघवी होते.

शोषण प्रक्रिया वाढते.जनावरांचे डोळे, हिरडी पिवळी पडते.

जनावरे वैरण खाणे, रवंथ करणे कमी करतात. आजारी जनावरांचे दूध देण्याचे प्रमाण कमी होते.

बाधित जनावरे माती चाटतात किंवा अधूनमधून ठसकतात.

निदान

लघवीच्या रंगात बदल, तीव्र ताप, डोळे पिवळे असणे, अंगावर गोचीड दिसतात. रक्तामधील लाल पेशी आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. रोग निदान चाचणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

उपचार पद्धती

आदिजीव नियंत्रणासाठी मूलभूत औषधे घ्यावीत. आजारामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जनावरांना तोंडावाटे रक्तवाढीचे औषध द्यावे. बाधित जनावरांच्या अंगावरील गोचीड नियंत्रण करावे. ताप कमी होण्यासाठी तातडीने औषधोपचार करावेत.

प्रतिबंधात्मक उपाय

आजारासाठी कारणीभूत आदिजीवांचा प्रसार गोचीडामार्फत होत असल्याने गोचिड नियंत्रण हा प्रभावी उपाय आहे.

गोचीड गोठ्यातील माती, भिंत किंवा लाकडावर बसून राहतात. त्यामुळे गोठ्यातील जनावरे बाहेर काढून गोचिडनाशकांची फवारणी करावी. गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी.

डॉ. सिद्दीकी एम.एफ.एम.एफ.

९९६०१४७१७१

(पशू औषधवैद्यक शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT