Animal Disease : जनावरांतील चयापचयाचे आजार

Animal Care : दुधाळ गाय,म्हैस व्याल्यानंतर ५ ते ६ दिवसानंतर दूध उत्पादन वाढते. ३ ते ४ आठवड्यात दूध उत्पादनाची उच्च पातळी गाठतात. विण्यापूर्वी २ ते ३ आठवडे आणि व्यायल्यानंतरचे २ ते ३ आठवड्यांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे.
Animal
AnimalAgrowon

डॉ. संदीप ढेंगे, डॉ. मंगेश वैद्य

Animal Husbandry : दुधाळ गाय,म्हैस व्याल्यानंतर ५ ते ६ दिवसानंतर दूध उत्पादन वाढते. ३ ते ४ आठवड्यात दूध उत्पादनाची उच्च पातळी गाठतात. विण्यापूर्वी २ ते ३ आठवडे आणि व्यायल्यानंतरचे २ ते ३ आठवड्यांचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे.

संक्रमण कालावधी दरम्यान शरिरक्रियात्मक बदलांमुळे चयापचय क्रियांवर ताण आल्यामुळे शरीरातील जीवरसायनांची (ग्लुकोज, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम) पातळी असमतोल होते. यामुळे चयापचय क्रियांसंबधीत आजार दिसतात.

दुग्ध ज्वर

जास्त दूध देत असलेल्या गाई,म्हशींत व्यायल्यानंतर लगेचच हा आजार दिसतो. शरीरातील विभिन्न क्रिया सुरळीत असण्यासाठी कॅल्शिअमची आवश्यकता आहे.

व्याल्यानंतर लगेचच चीक दूध आणि नंतर दूध निर्मितीकरिता जास्त मात्रेत शरीरात कॅल्शिअमची गरज असल्याने आणि संक्रमण कालावधीत कमी प्रमाणात शुष्क पदार्थांच्या उपलब्धतेमुळे

शरीरातील कॅल्शिअम जलद गतीने कमी होते.

Animal
Animal Disease Solution : जनावरांच्या आजारांवर उपाययोजना

लक्षणे

व्यायल्यानंतर ४८ ते ७२ तासांनी व्यवस्थितपणे उभे राहता येत नाही, मान वर करता येत नाही. हृदयाची स्पंदने वाढतात.

मान समोरच्या पायावर टेकीत डोके मागच्या दिशेने ठेवीत छातीच्या भारावर पहुडलेल्या स्थितीत सुस्त पडून राहातात.

शारीरिक तापमान बाह्य वातावरणातील तापमानाशी स्वनियंत्रित करू शकत नसल्याने शारीरिक तापमान कमी होते, गुदद्वार बाहेर येतो, पोट फुगते, लघवी आणि विष्ठेचे उत्सर्जन थांबते, बाहेरील संवेदनांना प्रतिसाद देत नाहीत. आजाराची तीव्रता अधिकच वाढल्यास गाय, म्हैस जमिनीच्या सपाट दिशेत निपचित लोळलेल्या दिसतात आणि डोळ्यांची हालचाल थांबते आणि शारीरिक तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते.

निदान

पूर्व इतिहास (व्यायल्याची नोंद), आढळणारी मुख्य लक्षणे (छातीच्या भारावर पहुडलेली स्थिती, मान वर करता न येणे, गुदद्वार बाहेर येणे, लघवी आणि विष्ठेचे उत्सर्जन थांबणे इ.) आणि रक्तातील कमी झालेली कॅल्शिअम पातळीची प्रयोगशाळेत तपासणी करून आजाराचे योग्य निदान करता येते.

उपचार

आजाराची लक्षणे तपासून तातडीने पशू तज्ज्ञांच्याकडून उपचार करावेत.

Animal
Animal Diseases : जनावरांना फक्त कोरडा चारा दिल्यामुळे होऊ शकतो उरमोडी आजार

प्रतिबंधात्मक उपाययोजना

व्यायल्यानंतर जास्त दूध उत्पादन असलेल्या गाई,म्हशीत आजाराची दाट शक्यता असल्याने विण्याच्या ३ आठवड्यांपूर्वीपासून कमी प्रमाणात कॅल्शिअम व पोटॅशिअम असलेले खाद्य द्यावे.

व्याल्यानंतर १ टक्के कॅल्शिअम व ०.३० ते ०.४५ टक्के मॅग्नेशिअम (शुष्क पदार्थ आधारित) खाद्यातून पुरवावे. व्यायल्यानंतर जीवनसत्त्व डी चे इंजेक्शन ३ दिवस दिल्यास आजारास प्रतिबंध करता येऊ शकते.

गाय-म्हैस व्याल्यानंतर दुग्ध ज्वर विकारास प्रतिबंध करण्यासाठी घरगुती उपाययोजना म्हणजे, मातीच्या मडक्यात २० लिटर पाण्यात १ किलो चुना रात्रभर भिजत ठेवावा. २०० मिलि वरची चुन्याची निवळी २०० मिलि ताज्या पाण्यात मिसळून व्यायलेल्या जनावरांना रोज पाजावी. दर २० दिवसांनी नवीन चुन्याचे मिश्रण तयार करावे.

हायपोमॅग्नेसीमीया

चेतासंस्था, स्नांयुचे कार्य व्यवस्थित असण्यासाठी शरीरात मॅग्नेशिअमची पातळी नेहमी संतुलीत असणे आवश्यक आहे. मॅग्नेशिअमची शारीरिक पुर्तता बहुतांश प्रमाणात खाद्यामार्फत होत असल्याने खाद्यात कमी प्रमाणात मॅग्नेशिअम असल्यास व्यालेल्या गायी-म्हशीमध्ये मॅग्नेशिअमची पातळी कमी होते. यामुळे हायपोमॅग्नेसीमीया आजार होतो.

खाद्यात अल्प प्रमाणात मॅग्नेशिअम असल्याने आणि व्यायल्यानंतर दूध निर्मितीसाठी मॅग्नेशिअमची मागणी वाढल्याने शारीरिक मॅग्नेशिअमची पातळी कमी होऊन दुधाळ जनावरांना हायपोमॅग्नेसीमीया होतो. दुधाळ जनावरांच्या खाद्यात मॅग्नेशिअम कमी असल्यास आजार होतो.

लक्षणे

तीव्र शारीरिक हालचाल, दूध उत्पादन कमी होते. वैरण किंवा खाद्य कमी प्रमाणात खातात.

शरीरातील मॅग्नेशिअमची पातळी खूप कमी झाल्यास गाय,म्हैस खूप अस्वस्थ आणि जास्त आक्रमक असल्याची लक्षणे दिसायला लागतात.

पोट, छाती आणि चेहऱ्यावरील स्नायूंची हालचाल होते. अति तीव्र शारीरिक हालचालीने शरीर ताठ होऊन झटके येतात, दातखीळ बसते.तोंडाला फेस येतो. उपचाराअभावी शारीरिक मॅग्नेशिअमची पातळी खूप कमी झाल्याने जनावराचा मृत्यू होतो.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

दुधाळ गाय-म्हशीला दररोज २० ते २५ ग्रॅम मॅग्नेशिअमची आवश्यकता असते. पिण्याच्या पाण्यातून तज्ज्ञांच्या सल्याने मॅग्नेशिअम किंवा खनिज मिश्रण असलेल्या विटातून नियमितपणे मॅग्नेशिअम पुरविणे गरजेचे आहे.

डॉ. संदीप ढेंगे, ९९६०८६७५३६, (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि.लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com