Maha Pashudhan Expo Agrowon
काळजी पशुधनाची

Maha Pashudhan Expo : ‘पशुधन एक्‍सपो’मध्ये नागपुरी म्हैस, बेरारी शेळीला पुरस्कार

शिर्डी येथे पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय ‘पशुधन एक्‍सपो’मध्ये नागपूर जिल्ह्याने बाजी मारत नागपुरी म्हैस व बेरारी शेळी गटात पहिल्या ते तिसऱ्या क्रमांकाची सर्व बक्षीसे आपल्या नावे केली.

Team Agrowon

Nagpur News शिर्डी येथे पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय ‘पशुधन एक्‍सपो’ (Maha Pashudhan Expo)मध्ये नागपूर जिल्ह्याने बाजी मारत नागपुरी म्हैस (Nagpuri Buffalo) व बेरारी शेळी (Berari Goat) गटात पहिल्या ते तिसऱ्या क्रमांकाची सर्व बक्षीसे आपल्या नावे केली.

बाजारगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप उघडे यांच्या नेतृत्वात हे शेतकरी प्रदर्शनात सहभागी झाले होते. या यशाबद्दल नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनीही पशुपालकांचे कौतुक केले.

शिर्डी येथे राज्यस्तरीय पशुधन एक्‍सपोचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील जातिवंत पशुधन यामध्ये सहभागी झाले. यातील निवडक पशुधनाला गुणवत्तेनुसार रोख बक्षीस देत गौरविण्यात आले.

नागपूर जिल्ह्यातून देखील पशुपालक यामध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये रामकृष्ण बाभूळकर (बाजारगाव) यांच्या पशुधनाला नागपुरी म्हैस श्रेणीत दुसरे बक्षीस मिळाले. बाबराव भड (काथलाबोडी, काटोल) यांनी तर विक्रम करीत नागपुरी म्हैस श्रेणीत पहिली आणि तिसरे अशी दोनही बक्षीसे आपल्या नावे केली.

बेरारी शेळी गटात देवराव राऊत (रा. शिवा, नागपूर) यांना तर कोणी प्रतीस्पर्धीच नसल्याची स्थिती निर्माण झाली होती. राऊत यांनी शेळ्यांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले. त्याच्याच परिणामी एक ते तीन अशी सर्वच्या सर्व श्रेणीतील बक्षीसे त्यांनी पटकाविली.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप उघडे यांच्या नेतृत्वात पशुपालक एक्‍सपोमध्ये सहभागी झाले होते. पशुपालकांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा यांनी त्यांचा सन्मान केला. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कविता मोरे यांची या वेळी उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurment : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार ४०० कोटी रुपये दिल्याची केंद्र सरकारची माहिती; सीसीआयच्या खरेदीपासून शेतकरी मात्र वंचित

Maharashtra Unseasonal Rain: उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; राज्यात कोकण वगळता वादळी पावसाचा इशारा

Village Governance: ग्रामसभा आणि ग्रामस्तरावरची अंमलबजावणी

Dam Water Storage: मंगरूळ, सुकी, अभोडा धरणांत जलसाठा मुबलक

Vidarbha Irrigation Projects: विदर्भातील ५ सिंचन प्रकल्पांची कामे भूसंपादनाअभावी प्रलंबित- गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT