Maha Pashudhan Expo 2023 : पशुप्रदर्शनात राज्यातील १०० शेतकऱ्यांचा गौरव

शिर्डी येथे २४ ते २६ या कालावधीत पशुसंवर्धन विभागाकडून पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीनदिवसीय राज्यस्तरीय पशुप्रदर्शन झाले.
Livestock exhibition
Livestock exhibition Agrowon
Published on
Updated on

Maha Pashudhan Expo 2023 Ahmednagar : शिर्डी (जि. नगर) येथे झालेल्या राज्यस्तरीय पशुप्रदर्शनात (Livestock Exhibition) पशुसह सहभाग घेतलेल्या राज्यातील १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते रविवारी (ता. २६) समारोप कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला.

शिर्डी येथे २४ ते २६ या कालावधीत पशुसंवर्धन विभागाकडून पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीनदिवसीय राज्यस्तरीय पशुप्रदर्शन झाले. यात १२ राज्यांतील ११ जाती, २४ प्रजातींची ७८१ विविध पशू, पक्षी सहभागी झाले.

त्यातून परीक्षण करून ११० पशुपालकांना प्रथम ५० हजार, द्वितीय २१ हजार व तिसरे ११ हजारांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या वेळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुजय विखे आदी उपस्थित होते.

अनुक्रमे प्रथम, द्वितीय, व तृतीय बक्षिसाने गौरव झालेले शेतकरी असे ः

गाय वर्गातील खिलारमध्ये सुनील पवार, प्रज्योत कुंभार, श्यामराव नागतीलक, कालवड गटात अभिजित नागतीलक, सिराज पठाण, मारुती महरडे, लहान बैलगटात रणजित जाधव, अभिजित जाणकर, छगन गलांडे, मोठे बैल गटात विठ्ठल पवार, दत्तात्रेय भांडगा, सत्यवान बायकुळे, डांगी गायमध्ये सागर आडोळे, सागर भोसले, ज्ञानदेव कासार, कालवड गटात दत्तू वाजे,

Livestock exhibition
Livestock Exhibition : शिर्डी येथे मार्चमध्ये राज्यस्तरीय पशुपक्षी प्रदर्शन

रामदास गंभिरे, करण भोसले, डांगीलहान बैल गटात भाऊसाहेब भोसले, भाऊसाहेब घोटे, धोंडीबा बिन्नर, मोठे बैल गटात रामदास गंभिरे, भाऊ गंभिरे, संतोष जाखेरे, लाल कंधारी गटात भीमराव सपनर, बालाजी पांडुरणे, संतोष तिडके, कालवड गटात परसराम सपनर, सिकंदर शेख, भिवाजी नरवट, लहान बैल गटात अनंता लाड विठ्ठल पांडुरणे, विठ्ठल देवकाते, मोठे बैल गटात महेश्वर धोंडे, संग्राम मुस्तापुरे, रमेश राठोड, देवणी गाय गटात बालाजी जाधव, संतोष तिडके,

बालाजी केंद्रे, कालवड गटात त्रिंबक शेरकर, सुदाम लवटे, वैभव केंद्रे, लहान बैल गटात संजय जाधव, सुखदेव सापनर, रोतकर माने, मोठे बैल गटात युसूफ पटेल, बालाजी पिंपळे, नवनाथ सापनर, गवळावू गटात संजय गल्हत, भोजराज अरबर, आशिष सावणकर, मोठे बैल गटात भोजराज अरबर, प्रल्हाद इसोले, आशिष सावणकर, कठाणी गटात शुभम डफ, अशोक गायधनी, देवरज कातरे, एचएफ गाय गटात अमोल खर्डे, प्रमोद टाके, विश्‍वंभर माल्वासे, कालवड गटात उत्तम काबाडी, अभिजित काळे, गीर गाय वर्गात मारुती पालोदे, जितेंद्र बिहाणी, अनिरुद्ध पाटील, जर्सी संकरित गटात चंद्रहंस हामणे, सचीन मैरण, राजेंद्र लहरे यांना गौरविले.

शेळीमध्ये उस्मानाबादी मादी गटात बाबूराव बनसोडे, रमेश चंदनशीवे, बाळू बोबडे, नर गटात अहिल्यादेवी शेळी-मेंढी महामंडळाचे तुळजापूर सेंटर, सूरज यमगर, मुतिखा शेख, संगमनेर शेळी मादी गटात अहिल्यादेवी शेळी-मेंढी महामंडळाचे पडेगावव सेंटर, शरद पावसे, विकास रहाणे,

Livestock exhibition
Livestock Exhibition : शिर्डीतील पशुप्रदर्शनात तेरा राज्यांतील जनावरे

बेरारी शेळी मादी गटात देवराज राऊत, जामनापरी शेळी मादी गटात रामदुलार सिंह व बारबेरी शेळी गटात निपेंद्र त्रिपाठी यांना प्रत्येकी तीन बक्षिसे मिळाली. मेंढीमधील म्याडग्याळ गटात सुभाष पाटील, डेक्कनी गटात, अहिल्यादेवी शेळी-मेंढी महामंडळाचे मुखेड येथील सेंटर यांनी प्रत्येकी तीन बक्षिसे मिळाली. कुक्कुटपालनमध्ये सातपुडा देशी गटात यशवंत अॅग्रोटेक, टरकीमध्ये बाॅस्को ग्रामीण विककास प्रकल्प प्रथम आले. अश्‍व गटात अभिजित शिंदे, अमोल लहामते, व सय्यद शहाबुद्दीन यांना बक्षिसे मिळाली.

दूध उत्पादकांचा गौरव

पशुप्रदर्शनात अधिक दूध देणाऱ्या जनावरांच्या पालकांचा गौरव झाला. यात दूध स्पर्धेत गाय गटात रमेश गुंजाळ, रूपाली कासार, स्वानंद नेहरे, म्हैस वर्गात किरण दंडनायक, मनोहर सूर्यवंशी, शरद दंडनायक, पंढरपुरी गटात समाधान अधटराव, दत्तात्रेय भोसले, आकाश मिसाळ, नागपुरी वर्गात बाबाराव भांड, रामकृष्ण बाभुळकर यांना गौरविण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com