Goat Feed Management  Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Market : ईदनिमित्त परराज्यातून बकऱ्यांची आवक

Bakri Eid : सोजत, शिरोही, गुजरी, तोतापरी, अजमेरा, बीटल, भरभरा, कोटा, काठियावाडी अशा अनेक प्रजातींचे बोकड साधारणतः पंधरा ते चाळीस हजार रुपयांपर्यंत विकले जात आहेत.

Team Agrowon

Ratnagiri News : ईद -उल्-अजहा अर्थात बकरी ईद गुरुवारी (ता. २९) साजरी होणार आहे. या निमित्ताने चिपळूण तालुक्यात अनेक प्रकारचे बकरे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. येथील स्थानिक विक्रेत्यांनी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरातसह विविध राज्यांमधून कुर्बानीसाठी खास बकरे आणले आहेत.

सोजत, शिरोही, गुजरी, तोतापरी, अजमेरा, बीटल, भरभरा, कोटा, काठियावाडी अशा अनेक प्रजातींचे बोकड साधारणतः पंधरा ते चाळीस हजार रुपयांपर्यंत विकले जात आहेत. ईद-उल्-अजहाच्या दिवशी बकऱ्यांच्या कुर्बानीची परंपरा आहे.

या अनुषंगाने दरवर्षी ईदच्या काळात कोट्यवधींची उलाढाल पाहायला मिळते. चिपळूण शहरातही देशभराच्या विविध राज्यांमधून बकऱ्यांची आवक होत असते. चिपळूण शहरातील खाटीक अळी भागात बकरा विक्री जोरात होते.

येथील बकराविक्रेते निजाम सय्यद म्हणाले, की सामान्य दिवसांच्या तुलनेत बकरी ईदच्या वेळेस बोकड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ होते. यावर्षी राजस्थानमधील आलेल्या बोकडांना जास्त पसंती मिळत आहे. जशी ईद जवळ येत जाईल तशी बाजारांमध्ये ग्राहकांची संख्या वाढत जाईल.

मागील काही वर्षांपासून बोकडे वजनाप्रमाणे जायचे; पण यावर्षी मात्र नगावर विक्री सुरू झाली आहे. चिपळूण खेड भागातही स्थानिक लोकांनी शेळीपालन व्यवसाय केला आहे. त्यांच्याकडूनही बकरे विकत घेतले जात आहेत. स्थानिकांचा दर थोडा जास्त आहे. स्थानिक व्यावसायिक चारशे रुपये किलो या दराने बकरे विकत आहेत; मात्र राज्यातून आम्हाला नगावर बकरे दिले जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT