Bakri Eid : तोतापूरी जातीच्या बकऱ्याला ८ लाखांची बोली

Kurbani Bakra : बकरी ईदचा सण काही दिवसांवर येवून ठेपला आहे. मुस्लिम धर्मीयांमध्ये बकरी ईदचे विशेष महत्त्व आहे. रमजान ईद प्रमाणेच मुस्लिम धर्मीयांमध्ये बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
Totapuri Goat Breed
Totapuri Goat BreedAgrowon
Published on
Updated on

Goat For Bakri Eid : बकरी ईदचा सण काही दिवसांवर येवून ठेपला आहे. मुस्लिम धर्मीयांमध्ये बकरी ईदचे विशेष महत्त्व आहे. रमजान ईद प्रमाणेच मुस्लिम धर्मीयांमध्ये बकरी ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. ईद-उल-अदाह म्हणजेच बकरी ईद हा त्यागाचा दिवस म्हणून मुस्लिम धर्मीय साजरा करतात. यादिवशी मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात.

बकरी ईदला कुर्बानीसाठी विशेष बकऱ्यांची मागणी असते. सध्या दिल्लीच्या जामा मशिदीजवळ उर्दू बाजारात बकरी ईदनिमित्त बकऱ्यांचा बाजार भरला आहे. खास बकरी ईदनिमित्त हा बाजार भरतो. या बाजारात हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यातीलही बकरे विक्रीसाठी आणले जातात.

सध्या या बाजारात उत्तरप्रदेशमधून विक्रीसाठी आणलेल्या एका बकऱ्याची खूप चर्चा रंगली आहे. या बकऱ्याचा लिलाव पाहण्यासाठीही मोठी गर्दी होत आहे. हा बकरा उंच आणि तंदुरूस्त असून दिसायला इतर बकऱ्यांच्या तुलनेत रुबाबदार आहे. या बकऱ्याच्या मालकाने त्याची किंमत तब्बल १५ लाख रुपये इतकी ठेवली आहे.

Totapuri Goat Breed
Sheru Goat Death : बकरी ईदपूर्वीच सव्वा कोटीच्या 'शेरू'चा मृत्यू

सलमान खानसाठी पाळला बकरा

हा बकरा तोतापूरी जातीचा आहे. सिनेअभिनेता सलमान खान याला विक्री करण्यासाठी हा बकरा पाळल्याचा दावा मालकाने केला आहे. पण काही कारणांमुळे त्यांना हा बकरा मुंबईला पाठविणे शक्य होत नाही. यंदाच्या बकरी ईदला या बकऱ्याची विक्री झाली नाही, तर पुढील वर्षी याला मुंबईला घेवून जाण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही बकऱ्याच्या मालकाने सांगितले.

१५ लाख रुपये किंमत ठेवण्याचे कारण

उत्तरप्रदेशातील हापूडचे रहिवासी असलेले यामीन यांचा हा बकरा आहे. तोतापूरी जातीच्या या बकऱ्याला लहानपणापासूनच त्यांनी घरी पाळला आहे. सहा महिन्यांचा असताना बकऱ्याच्या गळ्याजवळील पोटाच्या भागावर काही उर्दू शब्द दिसू लागले.

त्यानंतर अनेक मुस्लिम धर्मगुरूंना हे शब्द दाखविण्यात आले. त्यावेळी बकऱ्याच्या पोटावर अरबीमध्ये 'अल्लाह' हे नाव असल्याचे समजले. या बकऱ्याचे वजन १५० किलोच्या आसपास असून त्याचे वय दोन वर्षे इतके आहे.

Totapuri Goat Breed
Goat Market : लोणंदला शेळ्या-मेढ्यांची विक्रमी आवक

आतापर्यंत या बकऱ्यासाठी ८ लाखांची बोली लावली गेली आहे. मात्र, यामीन यांनी या बकऱ्याची किंमत १५ लाख रुपये ठेवली आहे. अजूनपर्यंत कोणत्याही खरेदीदाराने या बकऱ्यासाठी १५ लाखांची बोली लावली नाही. परंतु हा बकरा पाहण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करत असल्याचे यामीन यांचे म्हणणे आहे.

यामुळे तोतापूरी बकरे असतात महाग

हरियाणातील मेवात आणि राजस्थानमधील अलवरमध्ये मोठ्या प्रमाणात तोतापूरी जातीच्या बकऱ्यांचे संगोपन केले जाते. या बकऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे इतर बकऱ्यांच्या तुलनेत यांची उंची अधिक असते. याशिवाय यांचे वजन १०० किलोहून अधिक असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यांचे नाक पोपटासारखी वर उचललेले असते. त्यामुळे यांना तोतापूरी म्हटले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com