Animal Husbandry Department Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Husbandry : पुणे जिल्ह्यात पशुसंवर्धन पंधरवड्यास सुरूवात

Animal Care : यासाठी सर्व पशुवैद्यकीय दवाखाने, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडे बाजार याठिकाणी जनजागृती कार्यक्रमांसोबतच वंध्यत्व तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील पशुधनाच्या उत्पादक क्षमतेचा पुरेपुर वापर करून, पशुपालनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे राष्ट्रीय सकल उत्पादनात भर टाकण्याच्या उद्देशाने पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पुणे जिल्ह्यात १ ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत पशुसंवर्धन पंधरवडाचे आयोजन केले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.

पशुसंवर्धन पंधरवडा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश उच्च उत्पादन क्षमता असलेल्या पशू वंशावळीची पैदास, पशुस्वास्थ, पशुखाद्य, पशुचारा व व्यवस्थापन या पंचसुत्रीची पशुपालकांमध्ये जागृती निर्माण करून त्यात पशुपालकांचा सहभाग वाढावा असा आहे.

यासाठी सर्व पशुवैद्यकीय दवाखाने, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडे बाजार याठिकाणी जनजागृती कार्यक्रमांसोबतच वंध्यत्व तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे पशुपालक व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, दुध अनुदान योजना राबविताना येणाऱ्या अडचणीचे निराकरण, पशुधनास सकस आहार देण्यासाठी प्रोत्साहन जनजागृती व नजिकच्या भविष्यात केली जाणारी पशुगणना इत्यादी विषयांवर पशुपालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

गुरुवारी (ता. १) पशुसंवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांचे हस्ते जिल्हा परिषद पुणे येथे करण्यात आले. यावेळेस जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व प्रभारी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त पुणे विभाग डॉ.अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विष्णू गर्जे उपस्थित होते.

पशुसंवर्धन पंधरवड्यात पुणे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून या शिबिराचा लाभ घ्यावा.
- डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

Agriculture Minister Field Visit: कृषिमंत्र्यांकडून पीक नुकसानीची पाहणी

Grape Farmer Support: पोलिसांच्या दणक्याने द्राक्ष शेतकऱ्यांचे ६५ लाख परत

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

SCROLL FOR NEXT