Animal Care : जनावरांच्या प्रजोत्पादनावर जस्त, कॅल्शिअमचा परिणाम

Animal Reproduction : जस्त हे वेगवेगळ्या धातू-विकरांचा घटक म्हणून कार्य करते. ते प्रथिने संश्लेषण, न्यूक्लिक आम्ल चयापचय आणि कर्बोदके यांच्या चयापचयाशी संबंधित विकरांच्या कार्यात मदत करते. म्हणूनच, जननग्रंथीसारख्या पेशींमध्ये सक्रिय वाढ आणि विभाजनासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील

Animal Calcium Use : जस्त हे वेगवेगळ्या धातू-विकरांचा घटक म्हणून कार्य करते. ते प्रथिने संश्लेषण, न्यूक्लिक आम्ल चयापचय आणि कर्बोदके यांच्या चयापचयाशी संबंधित विकरांच्या कार्यात मदत करते. म्हणूनच, जननग्रंथीसारख्या पेशींमध्ये सक्रिय वाढ आणि विभाजनासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.

जस्ताच्या कमतरतेमुळे पुनरुत्पादक कार्ये गंभीरपणे बिघडतात आणि शुक्राणू तयार होणे आणि नरातील प्राथमिक आणि दुय्यम लैंगिक अवयवांचा विकास आणि गर्भधारणेपासून स्तन्यपानापर्यंत मादीमध्ये पुनरुत्पादन प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवर परिणाम होऊ शकतो.

झिंकची कमतरता असलेला आहार नर वासरास दिल्यास वृषणाची वाढ व्यवस्थित होत नाही. त्याचा आकार लहान होतो.

गायी-म्हशींसाठी ९ ग्रॅम दररोज

स्रोत : व्हीट मिडलिंग्स, झिंक क्लोराइड, मळी, मासळी आणि यीस्ट

आयोडिन

कमतरतेमुळे गायी-म्हशींमध्ये गर्भपात, गर्भ शोषून घेणे, माजावर न येणे, अनियमित माज चक्र आणि मृत वासरांचा जन्म अशा समस्या आढळून येतात.

दररोजची गरज: ०.१ मिलिग्रॅम प्रति किलो आहार

स्रोत : समुद्रातील खाद्य पदार्थ, मळी, मीट मिल, बोन मिल आणि आयोडीनयुक्त मीठ.

Animal Care
Animal Care : जनावरांच्या आरोग्याकडे द्या लक्ष

मॅंगेनीज

कमतरतेमुळे कमी वाढ आणि प्रजोत्पादनक्षमता कमी होते. नरांमध्ये वृषण ग्रंथीचा आकार कमी होतो. गायी-म्हशींमध्ये स्त्रीबीज सुटण्याची समस्या निर्माण होते तसेच वासरू चांगले निपजत नाही.

हाडांच्या निर्मितीमध्ये मॅंगनीजची भूमिका खूप महत्त्वाची आहे. अभ्यासाद्वारे निष्कर्षांमधून असे दिसून आले आहे की मॅंगेनीज झार ओलांडून गर्भात प्रवेश करू शकते. त्यामुळे गर्भातील मॅंगेनीजची साठवणूक आईच्या आहारावर अवलंबून असते.

मॅंगेनीज प्रोजेस्टेरॉन स्राव निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

दररोजची गरज: १६ ते २५ मिलिग्रॅम प्रति किलो आहार

स्रोत : गहू, हिरव्या चाऱ्यामध्ये पुरेसे मँगेनीज असते.

कॅल्शिअम

कमतरतेमुळे पशुधनामध्ये गर्भशयाची हालचाल मंदावते, मायांग बाहेर येते, वासरू अडण्यासारखा प्रकार दिसून येतो आणि त्यामुळे पशुप्रजननामध्ये अडथळा येतो.

कॅल्शिअम शरीरपोषणासाठी दररोज १४ ग्रॅम आणि प्रति लिटर दुधासाठी २.३ ग्रॅम एवढे लागते.

स्रोत : डायकॅल्शिअम फॉस्फेट, बोन मिल, मीट मिल, फिश मिल, चुनखडी, हिरवा द्विदल चारा.

स्फुरद

कमतरतेमुळे निष्क्रिय अंडाशय, विलंबित लैंगिक परिपक्वता आणि कमी गर्भधारणा दर अशा समस्या आढळून येतात. स्फुरदाच्या कमतरतेमुळे जनावर लवकर माजावर येत नाही, माजाचा बळस पातळ होतो, तार धरून जमिनीवर पडत नाही, गर्भधारणा कमी होते. स्फुरद शरीरपोषणासाठी दररोज १४ ग्रॅम आणि प्रति लिटर दुधासाठी २.० ग्रॅम एवढे लागते.

स्रोत : बोन मिल, डायकॅल्शिअम फॉस्फेट, डिफ्लोरीनटेड फॉस्फेट, डायअमोनियम फॉस्फेट, धान्य, ब्रान, पेंडी इत्यादी.

- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४

(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com