Animal Husbandry  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Vaccination : ब्रुसेला लसीकरणावरून पशुसंवर्धन आयुक्तांची नाराजी

Brucella Vaccination : जनावरांतील गर्भपात रोखण्यासह त्यापासून मानवाला होणारा संसर्ग रोखण्यासाठी चार ते आठ महिन्याच्या गायवर्गीय जनावरांना ब्रुसेला लसीकरण करण्यात येते.

Team Agrowon

Latur News : जनावरांतील गर्भपात रोखण्यासह त्यापासून मानवाला होणारा संसर्ग रोखण्यासाठी चार ते आठ महिन्याच्या गायवर्गीय जनावरांना ब्रुसेला लसीकरण करण्यात येते. जिल्ह्यात या लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून यात राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासोबत त्यांनी लम्पी व लाळ्या खुरकूत लसीकरणाच जिल्ह्याचे कामगिरी चांगली असल्याचे सांगत कौतुकही केले.

येथील प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयात शुक्रवारी श्री. दिवेगावकर यांनी लातूर, नांदेड, धाराशिव व हिंगोली जिल्ह्यांतील जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी जिल्हानिहाय कामकाजाचा आढावा घेतला. प्रादेशिक सहआयुक्त डॉ. नानासाहेब सोनवणे या वेळी उपस्थित होते.

जनावरांना गर्भपात झाल्यानंतर त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत पशुपालकांनाही संसर्ग होऊन विविध आजार होतात. यामुळे ब्रुसेला लसीकरणाला प्राधान्य देण्याची सूचना श्री. दिवेगावकर यांनी केली. या वेळी त्यांच्या हस्ते वडाची लागवड करण्यासह संकरित शुगर ग्रेजज्वारी व मॅक्स सायलेज मका बियाण्यांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.

भारत पशुधन प्रणालीचे महत्त्व, त्यानुसार दैनंदिन कामाच्या नोंदी अपलोडिंग, ई - प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता, पशुपालक आयडीचे सत्यापन आदी विषयांवर आढावा घेतला. कामकाजाच निष्काळजीपणा केल्यास संस्था प्रमुखांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

यासोबत पूर्वहंगामी लसीकरण व अन्य कामांची माहिती घेताना प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकारात्मक रितीने काम करून खात्याची प्रतिमा उंचवावी, असेही आवाहन त्यांनी केले. बैठकीनंतर त्यांनी पशुसंवर्धन चिकित्सालयातील यंत्रसामग्रीची पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT