Animal Vaccination : वाळवामध्ये ४० हजारांवर जनावरांचे लसीकरण

Animal Husbandry Department : वाळवा तालुक्यात पशुसंवर्धन विभागात मनुष्यबळ कमी असतानासुद्धा सहकारी दूध संघ, खासगी पशुवैद्यांच्या मदतीने तालुक्यातील दीड लाखावर पशुधनाचे पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण युद्ध पातळीवर सुरू आहे.
Animal Husbandry Department
Animal Husbandry DepartmentAgrowon

Sangli News : वाळवा तालुक्यात पशुसंवर्धन विभागात मनुष्यबळ कमी असतानासुद्धा सहकारी दूध संघ, खासगी पशुवैद्यांच्या मदतीने तालुक्यातील दीड लाखावर पशुधनाचे पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत ४० हजारांवर जनावरांचे लसीकरण झाल्याची महिती तालुका पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली.

वाळवा तालुक्यात २४ पशु वैद्यकीय दवाखाने आहेत. काही पशु वैद्यकीय केंद्र पशु वैद्यकांअभावी बंद आहेत. घटसर्प, फऱ्या, लम्पी स्कीन आजारांचे लसीकरण, पूरस्थिती, उपचाराअभावी तालुक्यातील पशुधन धोक्यात येण्याची शक्यता असल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सहकारी दूध संघ, खासगी पशुवैद्यकांशी समन्वय साधत जनावरांचे पावसाळ्यापूर्वी आवश्यक लसीकरण ५० टक्केवर पूर्ण करण्यात यश मिळवले आहे.

Animal Husbandry Department
Department of Animal Husbandry : सिंधुदुर्गात पशुसंवर्धन विभागातील ८७ पदे रिक्त

तालुक्यात १६ दवाखान्यांत पशुवैद्यकीय सुविधा सुरुवातीस राबविण्यात येत होती. पंचायत समितीमार्फत ८ गावांत पशुवैद्यकीय सुविधा राबविण्यात येत होती. राज्य शासनाच्या केंद्रात १ पशु वैद्यकीय डॉक्टर व ३ पशुधन पर्यवेक्षक उपलब्ध असून बाकी केंद्रात १२ पदे रिक्त आहेत. पंचायत समितीची आठ केंद्रे सुरू आहेत. ६ पशुधन विकास अधिकारी, २ पशुधन पर्यवेक्षक आहेत. पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक अशी ४ पदे रिक्त आहेत.

Animal Husbandry Department
Animal Husbandry : म्हशींच्या संगोपनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर

पशुधन १ लाख ५० हजार व पशुवैद्यकीय संख्या ११ आहे. डॉक्टरांवर कामाचा ताण येत असल्याने आवश्यक त्या वेळी ते उपलब्ध होऊ शकत नाहीत. शेतकरी भरडला जाऊ लागला आहे. काही ठिकाणी दोन, काही ठिकाणी पाच वर्षे झाली तरी डॉक्टर उपलब्ध नाहीत. याकडे प्रशासन गांभीर्याने बघताना दिसत नाही. काही वेळेस जनावरांच्या गंभीर आजाराचे निदान लागत नाही. योग्य वेळी योग्य उपचार होत नाहीत. अंदाज बांधून उपचार केले जातात. ते पशुधनाच्या जिवावर बेततात.

वाळवा तालुक्यात एकूण जनावरांची संख्या : १ लाख ५८ हजार ५९३

फऱ्या, घटसर्प, लम्पी स्कीन या आजारांना प्रतिबंध म्हणून वाळवा तालुक्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून ८३ हजार ८० लसींचे डोस उपलब्ध

आतापर्यंत ४० हजार ३९७ (डोस) जनावरांना लस देण्यात आले.

आजार मिळालेले डोस झालेले लसीकरण

घटसर्प / फऱ्या ३३,९८० १६,८१४

लम्पी २३,५०० १४,६८२

पिपीआर १६,४०० ६,२४७

आंत्रविषार ४,५०० २,१८२

वाळवा तालुक्यात पूरबाधीत क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे जनावरांना पावसाळ्यापूर्वी काही रोगांचे लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. मनुष्य बळ कमी आहे. स्थानिक दूध संघ, कार्यकाळ संपलेले पशुधन पर्यवेक्षक यांच्या सहकार्याने लसीकरण करणे सुरू आहे.
डॉ. सचिन वंजारी, पशुसंवर्धन उपायुक्त, वाळवा तालुका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com