Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : फुलवड्यात ‘लम्पी’ने एका बैलाचा मृत्यू

Lumpy Skin Disease : गावात अधिक जलद गतीने या आजाराचा प्रादुर्भाव होऊन परिसरातील जनावरांना या आजाराची लागण होण्याची शक्यता बळावली आहे.

Team Agrowon

Pune News : येथील जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली असून, एका बैलाचा मृत्यू झाला आहे. गावातील बरकीदरा, लोहकरेवस्ती, भगतवाडी, गणेशवाडी, लहान नंदकरवाडी, दांडेवाडी येथील जवळपास ५० ते ६० पशुधन या आजारामुळे बाधित झाली असून, जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील फुलवडे येथील पशुपालक चंद्रकांत लिंबा मोहरे, रोहिदास रूपाजी उघडे, विठ्ठल लक्ष्मण लोहकरे, मारुती भागू लोहकरे, श्रीकांत होनाजी लोहकरे, मोघाजी सोमा मोहरे, विकास नामदेव भारमळ यांच्या पशुधनास लम्पीची लागण झालेली आहे.

तर धोंडू भीमाजी भारमळ या पशुपालकाच्या बैलाचा लम्पी आजारामुळे मृत्यू झाला आहे. गावात अधिक जलद गतीने या आजाराचा प्रादुर्भाव होऊन परिसरातील जनावरांना या आजाराची लागण होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे पशुधन विकास विभागाने या भागात तातडीने लसीकरण मोहीम राबवून पशुपालकांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

लम्पी हा जनावरांमध्ये पसरणारा त्वचा रोग असून, यामुळे जनावरांच्या शरीराला गाठी येतात. पुढे त्या गाठींचा आकार मोठा होतो. या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रथम जनावरांना ताप येतो. त्यांचे वजन कमी होते, जनावरांच्या डोळ्यांतून चिकट पाणी टिपकते, तोंडातून लाळ पडते, जनावरे दूध कमी देतात व जनावरांची तब्येत जास्त खराब होते.

‘मृत जनावराचे शास्त्रोक्त पद्धतीने दफन करा’

लम्पीची लागण झालेल्या पशुधनाला वेगळे ठेवा. गोठ्यातील माश्या, डास, गोचीड यांच्या निर्मूलनासाठी कीटकनाशके फवारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर मृत्यू झालेला पशुधनाचा मृतदेह मोकळ्या जागेवर न सोडता त्याचे शास्त्रोक्त दफन करण्याच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT