Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे लांजात ३४ जनावरांचा मृत्यू

Lumpy Skin Anima Death : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात लम्पी स्कीन या त्वचा आजाराने डोके वर काढले असून, आतापर्यंत लम्पी स्कीन आजाराचा ६५१ जनावरांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon
Published on
Updated on

Ratnagiri News : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात लम्पी स्कीन या त्वचा आजाराने डोके वर काढले असून, आतापर्यंत लम्पी स्कीन आजाराचा ६५१ जनावरांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. यामध्ये ३४ जनावरांचा मृत्यू झाला आहे तर ३१४ जनावरे या आजारातून बरी झाल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. प्राजक्ता बर्गे यांनी दिली.

गतवर्षी ४५ जनावरे या साथीत दगावली होती. त्यामुळे पुन्हा या आजाराची जनावरांना लागण झाल्यामुळे तालुका पशुसंवर्धन विभागासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे आहे. लांजा तालुक्यात आतापर्यंत ६५१ जनावरांत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यात ८ पशुसंवर्धन दवाखाने असून, रिक्त पदांमुळे पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lumpy Skin
Lumpy Skin : नगरला ‘लम्पी स्कीन’ बाधितांत वासरांची संख्या जास्त

सद्यःस्थितीत तालुक्यात पशुधन विकास अधिकारी यांच्या तीन मंजूर पदांपैकी दोन रिक्त आहेत. सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची मंजूर तीनही पदे रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षकांच्या ११ पदांपैकी ३ भरण्यात आली असून, ८ रिक्त आहेत.

Lumpy Skin
Lumpy Skin : आता जनावरांसाठीही ‘पीपीई किट’चे संरक्षण

अशाप्रकारे मंजूर १७ पदांपैकी १० पदे रिक्त आहेत. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. तालुक्यात दिवसेंदिवस पशुधनाची संख्या वाढत आहे.

कोरोना महासाथीपासून ग्रामीण भागात शेती पशुधनवाढीकडे कल वाढला आहे. २०१९ च्या पशुधन गणनेनुसार गायी २८ हजार १०५, म्हशी २७४४, बोकड ३ हजार ८५०, शेळ्या २१७ असे एकूण ३६ हजारांहून अधिक पशुधन लांजा तालुक्यात होते. तालुक्यातील पशुधनात वाढ होत असून ती संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com