Lumpy Skin Disease  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे ८८१ जनावरे दगावली

Lumpy Skin Update : यंदा (२०२३) १ एप्रिल ते मंगळवार (ता. १२)पर्यंत लम्पी स्कीन आजारामुळे परभणी जिल्ह्यात ६८८ व हिंगोली जिल्ह्यात १९३, असे दोन जिल्ह्यांत मिळून एकूण ८८१ जनावरे दगावली आहेत.

Team Agrowon

Parbhani News : यंदा (२०२३) १ एप्रिल ते मंगळवार (ता. १२)पर्यंत लम्पी स्कीन आजारामुळे परभणी जिल्ह्यात ६८८ व हिंगोली जिल्ह्यात १९३, असे दोन जिल्ह्यांत मिळून एकूण ८८१ जनावरे दगावली आहेत. वासरांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात यंदा १ एप्रिलपासून मंगळवार (ता. १२)पर्यंत जिल्ह्यातील २ हजार ९८ गायी व २ हजार ३६५ बैल मिळून एकूण ४ हजार ४६३ जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या या आजाराचे जिल्ह्यात ९९१ सक्रिय पशुरुग्ण आहेत.

उपचारानंतर बरी झालेल्यांमध्ये १ हजार ३५८ गायी व १ हजार ४२६ बैल असे एकूण २ हजार ७८४जनावरांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात ६८८ जनावरे दगावली आहेत. त्यात तसेच ९५ गायी, १६४ बैल व ४२९ वासरांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २ लाख ९९ हजार ९०० जनावरांचे लसीकरण करण्या आले आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यात यंदा १ एप्रिलपासून मंगळवार (ता. १२)पर्यंत २ हजार ८२५ जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या या आजाराचे ९३० सक्रिय पशुरुग्ण आहेत. उपचारानंतर १ हजार ७०२ जनावरे बरी झाली. परंतु गंभीर असलेली १९३ जनावरे दगावली आहेत. जिल्ह्यातील २ लाख २६ हजार २४२ जनावरांचे लसीकरण करण्या आले आहे, असे पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

लम्पी स्कीन आजाराचा प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी पोळा सणांसाठी बैलजोड्या तसेच अन्य जनावरे एकत्रित सार्वजनिक ठिकणी आणू नयेत. पोळा घरीच अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.
- डॉ. पी. पी. नेमाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT