Lumpy Skin : लम्पीबाबत प्रशासनाची कागदोपत्री खबरदारी

Lumpy Skin Update : खानदेशात जळगावमधील जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, धुळ्यातील साक्री, शिरपूर, धुळे आदी भागात पशुधनात लम्पी स्कीन आजाराची समस्या वाढत आहे.
Lumpy skin disease
Lumpy skin diseaseAgrowon

Jalgaon News : खानदेशात जळगावमधील जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, धुळ्यातील साक्री, शिरपूर, धुळे आदी भागात पशुधनात लम्पी स्कीन आजाराची समस्या वाढत आहे. प्रशासनाने फक्त बाजार बंद व पशुधन वाहतूक थांबवून कागदोपत्री उपाययोजना केल्या. पण पशुधनाची हानी सुरूच आहे.

खानदेशात २५० पेक्षा अधिक गोवर्गीय पशुधनाचा मृत्यू लम्पीमुळे झाला आहे. दिवसागणिक पशुधनाचे मृत्यू वाढत अशून, आता साक्री, रावेर भागातही ही समस्या पसरू लागली आहे. आजार पसरत आहे. कुठेही त्यासंबंधी औषधोपचार, पशुवैद्यकांकडून पाहणी, मार्गदर्शन सुरू नाही. जळगाव तालुक्यात लम्पीचे लसीकरण मोजक्याच गावांत झाले आहे.

Lumpy skin disease
Lumpy Skin : नांदेडला ‘लम्पी’मुळे ६२६ जनावरे दगावली

सातपुडालगत व इतर भागात तातडीने सर्वेक्षण, लसीकरण, आजारी पशुधनावर उपचार व मार्गदर्शन करण्याची गरज आहे. लसीकरण खानदेशात १०० टक्के झाल्याचे दावे कृषी विभाग करीत आहे. पण तरीदेखील मृत्यूदर वाढला आहे.

गावोगावी सरपंच, पंचायत समितीचे सदस्य मदत करून किंवा वित्तसाहाय्य करून लसीकरण करून घेत आहेत. खासगी पशुवैद्यकांचीच मदत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यात अतिपावसात कापसाचे नुकसान झाल्याने दुष्काळात तेरावा, अशी स्थिती आहे.

Lumpy skin disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या नियंत्रणासाठी प्रशासनाकडून दिशा निर्देश जारी

प्रशासन फक्त कागदोपत्री उपाय करीत आहे. मध्यंतरी आजारी पशुधनाची माहिती खासगी पशुवैद्यकांनी द्यावी, असे आदेश प्रशासनाने दिले होते. परंतु या खासगी पशुवैद्यकांची मदत घेवून लसीकरण व उपचार, सर्वेक्षण आदी कार्यवाही सुरू झालेली नाही.

यामुळे आजार पसरत आहे. गायी व बैल अधिक आजारी आहेत. ताप येणे, कडक फोड खांदा व लगत तयार होणे, अशी समस्या आहे. त्यावर उपचार खासगी पशुवैद्यक करीत आहेत. ते किती प्रभावी व योग्य आहेत, हादेखील मुद्दा आहे.

यामुळे आजार वाढत आहे. पण प्रशासन आजार आटोक्यात असल्याची बतावणी सतत करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात लशी व इतर औषधे नाहीत. कर्मचारीही नसतात.

पशुवैद्यक दुपारी १२, १ नंतर दवाखान्यात सापडत नाहीत. यामुळे अडचणी आहेत. आजारी पशुधनावर उपचारासाठी शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात जाणे शेतकरी व पशुधनालाही शक्य नसते. तरीदेखील पशुवैद्यक पशुवैद्यकीय दवाखान्यात या, असे सांगत आहेत.

लम्पी स्किन या आजारामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. यात दूध उत्पादक व इतर शेतकऱ्यांची हानी जास्त होत आहे, पण प्रशासन फक्त कागदोपत्री काम करीत आहे, अशी स्थिती आहे.
- रमेश पाटील, शेतकरी, रावेर, जि.जळगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com