
Nanded News : जिल्ह्यात लम्पी स्किन आजाराची बाधा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजपर्यंत एकूण ६४० बाधित गावातील पाच हजार २६३ गायवर्ग पशुधनाला या आजाराची बाधा झाली आहे. तर ६२६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर पाच हजार ३८५ जनावरे बरे झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रविणकुमार घूले यांनी दिली.
या आजाराचा फैलाव दररोज होत असल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हा लम्पी बाधित घोषित केला आहे. तर बुधवारापासून (ता. ६) जिल्ह्यातील गायवर्ग पशुधनाच्या खरेदी-विक्रीवर प्रतिबंध लावले आहेत. या आजारामुळे जिल्ह्यातील पशुपालक धास्तावले आहेत. अनेक दुभत्या गायी, ओढकाम करणारी मोठी जनावरे, तसेच इतर पशुधनही या आजाराला बळी पडत असल्याने दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत ८४० बाधित गावात पाच हजार २६३ गाय वर्ग पशुधनाला या आजाराची बाधा झाली आहे. तर ६२६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर पाच हजार ३८५ जनावरे बरे झाले आहेत. अद्याप १० जनावरे गंभीर आजाराने ग्रासले आहेत.
गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे.
लम्पीची बाधा झालेल्या ६१४ जनावरांवर औषधोपचार चालू आहे. सद्यःस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. आजपर्यंत चार लाख ७८ हजार १०४ प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या १५७ वर पोहचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. घूले यांनी केले.
जिल्ह्यात ८४० गावे बाधित..
नांदेड जिल्ह्यातील ८४० गावे लम्पी बाधित आहेत. या गावातील पाच हजार २६३ बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या पाच किलोमीटर परिघातील गावांची संख्या ६४३ झाली आहे. या बाधित गावांच्या पाच किलोमीटर परिघातील जनावरांवर पशुवेद्यकी अधिकाऱ्यांकडून उपचार केले जात आहेत. आजपर्यंत लम्पीमुळे ६२६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशूची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.