Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी स्कीन आजारामुळे २२१ जनावरे दगावली

परभणी जिल्ह्यात लम्पी स्कीन आजारामुळे बाधित जनावरांची संख्या गुरुवार (ता. २२) पर्यंत ३ हजार २१४ पर्यंत वाढली. त्यापैकी २२१ जनावरे दगावली असून, त्यात गायी ३०, बैल ७१, वासरे १२० यांचा समावेश आहे.

टीम ॲग्रोवन

परभणी ः परभणी जिल्ह्यात लम्पी स्कीन आजारामुळे (Lumpy Skin Disease) बाधित जनावरांची संख्या गुरुवार (ता. २२) पर्यंत ३ हजार २१४ पर्यंत वाढली. त्यापैकी २२१ जनावरे दगावली (Animal Death) असून, त्यात गायी ३०, बैल ७१, वासरे १२० यांचा समावेश आहे. उपचारानंतर १ हजार ८७६ जनावरे बरी झाली आहेत. सध्या या आजाराच्या १ हजार ११७ सक्रिय जनावरांपैकी ६१ जनावरे गंभीर आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली.

गुरुवार (ता. २२) पर्यंत जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ८४९ पैकी ३५७ गावांतील १ हजार २७१ गायी आणि १ हजार ९४३ बैलांना या आजारांचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराची ईपी सेंटर १४२ आहे. ईपी सेंटरच्या ५ किलोमीटर परिघातील गावांची संख्या ६१८ झाली आहे.

परभणी जिल्ह्यात एकूण जनावरांची संख्या ३ लाख ९८ हजार ३५६ होती. त्यात १ लाख ३७ हजार १५० गायवर्गीय, १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय आणि ९८ हजार ४९५ म्हैस वर्गीय जनावरांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार १५० गाय वर्गीय आणि १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय असे एकूण २ लाख ९९ हजार ८६१ जनावरांच्या लसीकरणांसाठी २ लाख ९९ हजार ३०० लसी प्राप्त झाल्या होत्या.

गोशाळांतील ३ हजार ९९५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात गोवर्गात केलेले स्वच्छ लसीकरण ३१ हजार ६८९ आहे. गुरुवार (ता. २२) पर्यंत १ लाख ३८ हजार ९१६ गायवर्गीय आणि १ लाख ५२ हजार ८६९ बैलवर्गीय आणि ५ हजार ४६९ म्हशी असे एकूण २ लाख ९७ हजार २५४ जनावरांचे (९९.१३ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. एकूण २ हजार ४६ लस मात्रा शिल्लक होत्या, असे डॉ. नेमाडे म्हणाले.

‘लम्पी स्कीन’मुळे दगावलेली तालुकानिहाय जनावरे

तालुका गाय बैल वासरू एकूण

परभणी १५ ११ ३१ ५७

जिंतूर ४ ८ २५ ३७

सेलू २ १० ५ १७

मानवत २ १४ १९ ३६

पाथरी २ ४ ३ ९

सोनपेठ २ ५ २ ९

गंगाखेड १ ७ २० २८

पालम १ ५ ६ १२

पूर्णा १ ६ ९ १६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production: मक्याचे गणित बिघडण्याचे कारण काय?

Banking Problems: बँकेबाहेर खातेदारांची उन्हात गर्दी

Kolhapur Sugarcane Price Protest: ऊसदरासाठीचं आंदोलन चिघळलं, 'स्वाभिमानी'नं ओलम कारखाना बंद पाडला, ३,४०० रूपये दर मान्य नाही

Farmer Crop Loss: माजलगावात शेतकऱ्यांना बसला तब्बल १३ कोटींचा फटका

Farmer Tourism: शेतकऱ्यांचे पर्यटन: बैलगाडी ते विमान

SCROLL FOR NEXT