Chhatrapati Sambhajinagar: येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखेत अनुदानासाठी खातेदारांची गर्दी होत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दिवसभर बँकेचे व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना बाहेर उन्हात ताटकळण्याची वेळ येते. शिवाय खातेदारांना सेवा देताना बॅक व्यवस्थापनाच्याही नाकीनऊ येत आहे..सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन तथा माजी मंत्री स्व. माणिकराव पालोदकर यांनी ५ नोव्हेंबर १९८६ मध्ये माणिकनगर (भवन) येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा चालू केली. .SBI Bank Loan : एसबीआय बँककडून किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी टोल-फ्री क्रमांक जाहीर .कारखान्यातील कर्मचारी, ऊस तोडणी मुकादम व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी आर्थिक व्यवहाराची देवाण-घेवाण अधिक सोयीचे होण्यासाठी या शाखेची सुरवात झाली. मात्र, व्यवहार कमी असल्या कारणाने निल्लोड बँकेची शाखा २००५ मध्ये बंद करून त्या शाखेतील खातेदार माणिकनगर (भवन) या शाखेत वर्ग केले. .Pune District Bank: जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून खरीप पीककर्जाचे वाटप.या बँकेत भवन जिल्हा परिषद सर्कलमधील भवन (माणिकनगर) सह चिंचखेडा, के-हाळा, पळशी, निल्लोड, कायगाव, टाकळी जिवरग, तलवाडा,गव्हाली, तांडाबाजार, पिंपळगाव पेठ, बोरगाव कासारी आदी बारा गावांचा भार आहे. या बँकेत निराधार, दिव्यांग योजनांचे अनुदान, शेतकऱ्यांचे विविध अनुदान, जिल्हा परिषदअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचे पगार, व्यावसायिकांचे दैनंदिन व्यवहार, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी असे सर्व मिळून जवळपास एकूण १९४२५ बँक खातेदार आहेत..५ कर्मचाऱ्यांची दमछाकमाणिकनगरच्या जिल्हा बँकेत एक शाखाधिकारी, एक कॅशिअर,कायम कारकून, मानधनावर कारकून, मानधनावर शिपाई, असे एकूण केवळ पाच कर्मचारी आहेत. मनुष्यबळाच्या अभावामुळे या पाच कर्मचाऱ्यांवर अधिक ताण येतो. या बँकेतून दररोज जवळपास एक कोटीपर्यंत व्यवहार होतो.तसेच बँकेत या खातेदारांनी गर्दी केल्यास या कर्मचाऱ्यांना काम करणे अवघड जाते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.