Team Agrowon
आधी दुहेरी राहणारी पशुधनाच्या मृत्यूची संख्या ही आता एकेरी राहत आहे. असे असले तरी पशुपालकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात गोवर्गीय पशुधनांची संख्या ५ लाख ३८ हजार ५७२ इतकी, तर उपचार केंद्रांची संख्या १४७ इतकी आहे.
१५ डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराची लागण झालेल्या पशुधनांची संख्या ९७३८ इतकी होती.
जवळपास ७८०४ पशुधन उपचारांती बरे झाले तर १०१७ पशुधनांवर दिशा निर्देशित केलेल्या पद्धतीनुसार उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील पशुधनाचे लसीकरण आधीच पूर्ण झाले आहे. याशिवाय केंद्रीय पथकाने जिल्ह्यात दिलेल्या भेटीत लम्पी स्कीन आजार नियंत्रणासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनेविषयी समाधान व्यक्त केले होते.
लम्पी स्कीन आजारामुळे मृत्यू होणाऱ्या पशुंच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.