Lumpy Skin
Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी स्किनने घेतला १८७ जनावरांचा बळी

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

पुणे : ‘‘लम्पी स्कीन’ आजाराचा राज्यात वेगाने प्रसार होत आहे. राज्यातील पशुधन मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भावग्रस्त होत आहे. ग्रामीण भागात वेळेत लसीकरण होत नसल्याने जनावरांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे. राज्यात या आजाराने आतापर्यंत १२६ जनावरांचा बळी घेतला आहे. दिवसेंदिवस यात वाढच होत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

गेल्या महिन्यापासून राज्यातील अनेक भागांत लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) वाढत आहे. २५ जिल्ह्यांत १८ सप्टेंबरअखेर एकूण ९६३ गावांमध्ये तब्बल ७ हजार ३५६ जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) दिसून आला आहे. एकूण ७३५६ प्रादुर्भावग्रस्त पशुधनापैकी (Livestock Infected Due To Lumpy Skin ) एकूण दोन हजार ७३० पशुधन उपचाराने बरे झाले आहे. उर्वरित पशुधनावर उपचार सुरु आहेत. शासनाने पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यात एकूण ४८ लाख ९३ हजार लशी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामधून प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राच्या पाच किमी परिघातील ९६३ गावांतील १७ लाख ७६ हजार पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. मंगळवारपर्यंत (ता.२०) २५ लाख लसमात्रा प्राप्त होतील.

पशुसंवर्धन आयुक्त सच्चिन्द्र प्रताप सिंह म्हणाले, “राज्यात लम्पी स्कीन आजाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. हा आजार केवळ गाई व बैलांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही. या बाबत अफवा पसरविलल्यास कठोर कारवाई केली जाईल. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत व नगर परिषद अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी.’’

या आजारावर उपयुक्त औषधांच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या निधीमधून लम्पी स्कीन आजारावरील नियंत्रणात्मक लसीकरणासाठी सेवादाता (व्हॅक्सीनेटर्स) व पशुवैद्यकीय महाविद्यालयातील आंतर्वासीता छात्र (ईंटर्नीज) यांना प्रति लसमात्रा तीन रुपये या प्रमाणे मानधन अनुज्ञेय केले आहे. यामध्ये सर्व खासगी सेवादात्यांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय पशुवैद्यकांनी व खासगी व्यावसायिकांनी महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत. अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. या बाबत तक्रार असल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्यात येईल. हा रोग माशा, डास, गोचिड किटकांमार्फत पसरत असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीने कीटकनाशकांची फवारणी करावी, असे सूचित करण्यात येत आहे..

‘लम्पी स्कीन’ची लक्षणे दिसल्यास जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने, पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन मोफत उपचार करून घ्यावेत. हा आजार पशुधानात वेगाने पसरतो. मात्र, तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. या आजाराने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये.
सच्चिंद्र प्रताप सिंह, आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, पुणे.

देशात पशुधनाचे मृत्यू वाढले

‘लम्पी स्कीन’मुळे आतापर्यंत देशभरात ८२ हजार ६६ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थानमध्ये ५३,०६४, पंजाबमध्ये १७,३१९, गुजरातमध्ये ५,५५४, हिमाचल प्रदेशमध्ये ३,२०९, हरियानामध्ये २,०७५ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांनी येथे संपर्क करावा

पशुपालकांनी तक्रार विभागाच्या टोल फ्री क्र.१८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटरमधील पशुसेवेच्या टोल फ्री क्र.१९६२ वर नोंदविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

...या जिल्ह्यात प्रादुर्भाव

जळगाव, नगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशीम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर.

जनावरांच्या मृत्यूची स्थिती

जिल्हा --- मृत्यू झालेल्या जनावरांची संख्या

जळगाव --- ६४

नगर ---२४

अकोला ---२८

पुणे ---१७

धुळे --- ७

लातूर --- ३

सातारा --- ९

बुलडाणा --- १०

अमरावती --- १३

सांगली --- १

वाशीम --- १

जालना --- १

नागपूर --- १

कोल्हापूर--- ७

ठाणे---१

एकूण --- १८७.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT