Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

Water Supply : यंदा जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळ असून ग्रामीण भागात तब्बल २८६ टॅंकरद्वारे एक हजार गावांना पाणीपुरवठा सुरू आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Nashik News : यंदा जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळ असून ग्रामीण भागात तब्बल २८६ टॅंकरद्वारे एक हजार गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईचे भीषण संकट असताना जिल्ह्यात यंदा टॅंकरने पाणी पुरवठा करणाऱ्या चालकांची १५ कोटींचे देयके थकल्याचे समोर आले आहे. टंचाईवरील उपाययोजना १५ जुलैपर्यंत सुरू राहील, असे गृहित धरून जिल्हा प्रशासनाने सरकारकडे २० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

जिल्ह्यात गतवर्षी उन्हाळ्यापासून टंचाईवरील उपाययोजना करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी २०२२-२३ च्या टंचाई निवारण आराखड्यातून जूनपर्यंत खर्च करण्यात आला. त्यानंतर ‘अल निनो’चा प्रभाव वाढल्यामुळे पावसाने दांडी मारल्यानंतर जूननंतरही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच राहिला.

Water Scarcity
Water Scarcity : ‘हर घर जल’ नव्हे; श्रीवर्धनमध्ये ‘हर गाँव टँकर’

पावसाचा हंगाम सुरू असतानाही व नंतरही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने दुष्काळी भागातील टँकरची संख्या कायम राहिली. यामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील अभूतपूर्व पाणी टंचाई गृहित धरून २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २० कोटींचा टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे.

मात्र, सरकारने आतापर्यंत केवळ २०२२-२३ च्या आराखड्यानुसार ४.३० कोटी रुपये व ‘अल निनो’च्या प्रभाव काळातील टंचाई निवारणासाठी २.५० कोटी रुपये व मागील काळातील शिल्लक ९१ लाख रुपये या उपाययोजनांवर खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने ७.८० कोटी रुपयांची टँकरचालकांची व विहिरी अधिग्रहण करण्यासाठीची देयके दिली आहेत.

Water Scarcity
Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

गत ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांची देयके प्रलंबित असून हे पुरवठादार प्रामुख्याने पूर्वभागात पाणी पुरवठा करतात. आता पश्चिम भागातही टँकरची मागणी वाढल्याने त्यांनी पूर्वभागातील थकीत देयकांची मागणी केली आहे.

निधी कधी मिळणार?

जिल्हा प्रशासनाने आता राज्य सरकारकडे जुलैपर्यंतचा खर्च गृहित धरून २० कोटीं रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यात दरवर्षी खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दोनच पुरवठादार असून त्यांच्याकडून प्रामुख्याने पूर्वभागात पुरवठा केला जातो. निधी मागणीचा प्रस्ताव पाठविला असला तरी, शासनाकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे हा निधी कधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com