Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Credit Society Computerization : जिल्ह्यातील ६८० विकास सेवा संस्थांपैकी मेअखेर २३१ संस्थांचे संगणकीकरण पूर्ण करावे, अशा सूचना सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी दिल्या.
Agriculture Credit Society
Agriculture Credit Society Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील ६८० विकास सेवा संस्थांपैकी मेअखेर २३१ संस्थांचे संगणकीकरण पूर्ण करावे, अशा सूचना सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी दिल्या. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचाही आढावा घेतला.

प्राथमिक कृषी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थांचे संगणकीकरण तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा शुक्रवार (ता. ३) आढावा अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांनी घेतला. सहकार आयुक्त व राज्य सहकार निबंधक शैलेश कोथमिरे, जिल्हा सहकार उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ उपस्थित होते.

Agriculture Credit Society
Cooperative Credit Society : सोसायट्यांमधील हेराफेरीला संगणकीकरणामुळे चाप

जिल्ह्यात ६८० कृषी पुरवठा करणाऱ्या विकास सेवा संस्था आहेत. त्यांच्या संगणकीकरणासाठी केंद्र सरकारच्या सहकार विभागाने मोहीम गेले वर्षभर सुरू आहे. त्याअंतर्गत आढावा बैठक घेण्यात आली.

सांगली जिल्ह्याचे सहकार विभाग आणि विकास संस्थांचे काम चांगले असूनही संगणकीकरणात जिल्हा मागे का, असा प्रश्‍न अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. त्यात संबंधित संगणकीकरण करणाऱ्या संस्थेकडे अपुरे कर्मचारी, मार्चअखेरमुळे गट सचिव वसुलीत गुंतले. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रेकॉर्ड नोंदीकडे पुरेसा वेळ दिला जात नाही, अशी कारणे यावेळी पुढे आली.

Agriculture Credit Society
Credit Societies : पतसंस्थांतील ठेवींना मिळणार संरक्षण

दरम्यान, तत्कालीन सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना भेटी दिल्या होत्या. विकास सोसायट्यांसाठी सीएससी सेंटर, जेनेरिक मेडिकल, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्‍ट्रक्चर स्कीम अंतर्गत ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम अंतर्गत पीक काढणी पश्चात करता येणारे उद्योग, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस वितरण, पीएम कुसुम योजना इत्यादींचा आढावा घेतला.

२२ संस्थांकडून उद्योग सुरू

केंद्राच्या ॲग्रिकल्चर इन्फास्ट्रक्चर फंड स्कीमअंतर्गत जिल्ह्यातील २२ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांनी पीक काढणी पश्चात उद्योग यामध्ये गोदाम, बनाना रायपेनिंग युनिट, सोलार पॉवर प्लॉट, शुगरकेन हार्वेस्‍टिंग मशिन, ॲग्रो स्टोअरेज सेंटर, औषध फवारणीसाठी ड्रोन इत्यादी उद्योग सुरू केले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com