Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Lok Sabha Election : नागपुरात लोकसभा निवडणुकीत मतदान कमी झाले. मतदार यादीतून अनेकांची नावे गहाळ होती. अनेकांना मतदान केंद्रच मिळाले नाही.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionAgrowon

Nagpur News : नागपुरात लोकसभा निवडणुकीत मतदान कमी झाले. मतदार यादीतून अनेकांची नावे गहाळ होती. अनेकांना मतदान केंद्रच मिळाले नाही. त्यामुळे अनेक मतदारांना मतदान करता आले नाही. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असून प्रशासनालाही लक्ष्य केले जात आहे.

महानगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका आधीच वेळेत झाल्या असत्या तर हा घोळ कमी झाला असता, अशी चर्चा प्रशासन व कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. या निवडणुकीत प्रशासनाने मतदान ७५ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी विविध उपक्रमही राबविले. परंतु याचा काहीसा उलट परिणाम दिसून आला.

Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

पंचनामा योग्यरीत्या झाला नसल्याने मतदारांची नावे यादीतून कमी झाली. मतदानाबाबतची माहिती वेळीच घेण्याची मानसिकता बहुतांश मतदारांची आहे. गेल्या सुमारे दोन वर्षांत मतदानाची वेळ आली नसल्याने मतदारांना यादी व मतदान केंद्राबाबतची माहितीच घेता आली नाही. मनपाची निवडणूक दोन वर्षांपासून झाली नाही.

Lok Sabha Election
Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

नगरपरिषद व नगर पंचायतींच्याही निवडणुका झाल्या नाहीत. या निवडणुका दरम्यानच्या काळात झाल्या असत्या तर मतदारांना यादीतील नाव मतदान केंद्राबाबतची माहिती मिळाली असती. या निवडणुका वेळेत झाल्या असत्या तर मतदारांचा घोळ कमी होऊन मतदानाची टक्केवारी वाढली असती, अशी चर्चा आता प्रशासनासोबतच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.

नगरसेवक नसण्याचा फटका

महानगर पालिकेच्या निवडणुका न झाल्याने नगरसेवकच नाही. नगरसेवकांना वसाहतीतील नागरिक, मतदारांची माहिती असते. मतदारांना बाहेर काढण्यातही त्यांची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत होते. परंतु यंदा नगरसेवकच नव्हते. त्यामुळे त्यांची सक्रियताही या निवडणुकीत पाहिजे त्या प्रमाणात दिसली नाही. त्यामुळे ते नसण्याचाही काहीसा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसल्याची चर्चा होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com