Crop Nutrient Management
Crop Nutrient Management Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Nutrient Management : कडधान्य पिकात कोबाल्ट का आहे आवश्यक?

Team Agrowon

पीक उत्पादनात (Crop Production) सूक्ष्म अन्नद्रव्यांचा बियांमध्ये उगवण आणि सुरवातीच्या रोप वाढीच्या अवस्थेत जैव रासायनिक क्रिया घडवून आणण्यात महत्त्वाचा सहभाग असतो. पिकांना सूक्ष्म अन्नद्रव्ये गरजेनुसार उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खते जमिनीद्वारे व फवारणीद्वारे दिली जातात. जमिनीद्वारे पुरवलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्यक्षमता फार कमी असते. कोबाल्ट हे सुक्ष्मअन्नद्रव्य कडधान्य पिकांतील रायझोबियम जिवाणूंच्या वाढीकरिता आवश्यक आहे. कोबाल्ट या सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा बीज प्रक्रियेतून करता येतो. कडधान्यातील कोबाल्ट या सुक्ष्म अन्नद्रव्याची गरज आणि महत्व याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.   

कडधान्य पिकातील कोबाल्ट चे महत्व का आहे? 

- कडधान्य पिकांच्या मुळांवरील गाठी रायझोबियम जिवाणूंच्या असतात. कोबाल्ट अन्नद्रव्य रायझोबियम जिवाणूंच्या वाढीकरिता आवश्यक आहे. 

- रायझोबियमद्वारे जीवनसत्त्व ब-१२ ची निर्मिती केली जाते. जीवनसत्त्व ब-१२ मुळे वनस्पतींमध्ये पेशी विभाजनाचे कार्य होत असते. 

- कडधान्ये पिकांच्या मुळांवरील गाठी दाबल्यानंतर येणारा गुलाबी रंग म्हणजेच लेगहिमोग्लोबीन योग्य प्रमाणात असला, तरच नत्र स्थिरीकरणाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे घडून येते. 

- कोबाल्टच्या वापरामुळे पिकांमध्ये अजैविक ताण जसे जमिनीतील क्षारता, इतर अन्नद्रव्यांची कमतरता व पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे कोबाल्ट अन्नद्रव्यास फायदेशीर अन्नद्रव्य म्हणून संबोधले जाते. 

- कोबाल्ट अति गरजेचे नसले तरी याच्या वापरामुळे उत्पादनात वाढ होऊ शकते. त्यामुळे कडधान्य उत्पादनात  वाढ करण्यासाठी कडधान्ये पिकांत कोबाल्टच्या बीज प्रक्रियेद्वारे वापरावर संशोधन होणे गरजेचे आहे.

कोबाल्ट वापराचे निष्कर्ष काय आहेत?

- आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या संशोधनानुसार भुईमूग पिकास हेक्टरी २०० ग्रॅम कोबाल्ट सल्फेट जमिनीद्वारे दिल्याने नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता तसेच उत्पादन व तेलाच्या प्रमाणातदेखील वाढ झाल्याचे दिसून आले.

- मूग पिकात प्रतिकिलो बियाण्यास १० मिलिग्रॅम कोबाल्ट सल्फेट (१० किलो बियाण्यास १ ग्रॅम) बीज प्रक्रिया केल्यामुळे उत्पादनात वाढ झाली.

- श्रावण घेवड्याच्या दहा किलो बियाण्यास १ ग्रॅम कोबाल्ट नायट्रेटची प्रक्रिया केल्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ आढळून आली. 

- दुधाळ जनावरांना कोबाल्टची गरज १.२ ते २.४ मिलिग्रॅम प्रतिदिवस असते. यामुळे चारा पिकात कोबाल्टचे योग्य प्रमाण असल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहून दूध उत्पादनात वाढ होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT