Maize Rate : मका बाजारावर आवकेचा दबाव

आहे. सध्या आवक कमी असली तरी पुढील काळात आवकेचा दबाव वाढत आहे. त्यामुळे सध्या दर काहीसे दबावात आहेत.
Maize Import
Maize ImportAgrowon

पुणे ः आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून मक्याच्या दरात (Maize Rate) सुधारणा होत आहे. मात्र देशातील बाजारात खरिपातील (Kharif Maize Arrival) नवा माल विक्रीसाठी येत आहे. सध्या आवक (Maize Arrival) कमी असली तरी पुढील काळात आवकेचा दबाव वाढत आहे. त्यामुळे सध्या दर काहीसे दबावात आहेत. सध्या देशातील बाजारात मक्याला (Maize Rate) १ हजार ९०० ते २ हजार १०० रुपये दर मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मक्याच्या वायद्यांमध्ये सुधारणा होत आहे. युक्रेनने रशियाच्या सैन्याच्या ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर रशियाने धान्य निर्यात करारातून माघार घेत युक्रेनमधून होणारी निर्यात पुन्हा बंद केली. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचा पुरवठा कमी होणार आहे. त्यातच अमेरिकेतही मका पिकाला कमी पावसाचा फटका बसला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याच्या वायद्यांमध्ये सुधारणा झाली.

Maize Import
Maize Import : मेक्सिको जीएम मक्याची आयात बंद करणार

आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे दर वाढत आहेत. मात्र देशातील दर काहीसे दबावात आहेत. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत दर चांगलेच आहेत, असे म्हणावे लागेल. सध्या देशात खरिपातील मक्याची आवक सुरु झाली. आवकेचा दबाव सध्या दक्षिणेतील बाजारात आहे. मात्र महाराष्ट्रातील बाजारातही नवा मका विक्रीसाठी येत आहे. नव्या मालाच्या हंगामाचा दबाव बाजारावर येत असून त्यामुळे दर दबावात असल्याचे जाणकार सांगतात.

Maize Import
Maize Market : देशातील मक्याचा बाजार दबावात

आंतरराष्ट्रीय बाजारात ६८० डॉलर प्रतिटन

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील वर्षभरात मक्याच्या दरात मोठे चढ-उतार होत राहिले. १ ऑगस्ट २०२१ रोजी मक्याच्या वायद्याने ५३७ डॉलर प्रतिटनाचा नीचांकी दर गाठला होता. त्यानंतर त्यात सुधारणा होत गेली. तर एक एप्रिल रोजी मक्याने उच्चांकी ८१७ डॉलर टप्पा गाठून पुन्हा गटांगळ्या घेत जुलैमध्ये ६१३ डॉलरपर्यंत घसरण झाली. त्यानंतर मक्याच्या दरातही वाढ होत गेली. शनिवारी (ता.५) मक्याच्या दराने ६८० डॉलरचा टप्पा गाठला होता.

नवा मका बाजारात

देशात सध्या नवा मका बाजारात येतोय. या मक्यामध्ये ओलावाही जास्त आहे. त्यामुळे दर दबावात आहेत. जास्त ओलावा असलेल्या मक्याला सध्या प्रतिक्विंटल १ हजार ५५० ते १ हजार ७५० रुपये दर मिळत आहे. तर ओलावा कमी असलेल्या मक्याला प्रतिक्विंटल १ हजार ९०० ते २ हजार १०० रुपये दर मिळतोय. ऐन आवकेच्या हंगामातही मका २ हजार ते २ हजार २०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com