Rabi Jowar Agrowon
ॲग्रो गाईड

Rabi Jowar : रब्बी ज्वारीच्या भरघोस उत्पादनासाठी कोणते वाण निवडाल ?

रब्बी ज्वारीची लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव वाढतो तर उशिरा पेरणी केल्यास जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे बियाणांची उगवण कमी होऊन ताटांची योग्य संख्या राखता येत नाही.

Team Agrowon

महाराष्ट्रात पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी रब्बी ज्वारीचे (Rabi Jowar) पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पश्‍चिम महाराष्ट्रात खरीप ज्वारीची (Kharif Jowar) लागवड होत नाही. या उलट मराठवाड्यात (Marathwada) दोन्ही हंगामांत ज्वारीचे पीक घेतले जाते. लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा (Stemfly) उपद्रव वाढतो तर उशिरा पेरणी केल्यास जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे बियाणांची उगवण कमी होऊन ताटांची योग्य संख्या राखता येत नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वारीची पेरणी करताना  कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषय़ी दिलेली माहिती पाहुया.  

रब्बी ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात जिरायती क्षेत्रावर केली जाते.  मध्यम ते भारी जमिनीत ओल जास्त काळ टिकून राहत असल्याने अशा जमिनीत रब्बी ज्वारीची पेरणी करावी. जिरायती क्षेत्रावर जास्त उत्पादन येण्यासाठी योग्य वाणाची निवड जमिनीच्या खोलीनुसार करावी. १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर हा काळ रब्बी ज्वारीची कोरडवाहू क्षेत्रामध्ये पेरणी करण्यासाठी शिफारस केलेला आहे. 

जमिनीच्या प्रकारानूसार वाणांची निवड महत्वाची

जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित संकरित वाणाचा वापर करावा. हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माऊली या वाणांची निवड करावी.

मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती आणि मालदांडी-३५-१ या वाणांची निवड करावी.

भारी जमिनीसाठी फुले वसुधा, फुले यशोदा, सीएसव्ही २२,  परभणी मोती आणि सीएसएच १५ या संकरित वाणांची निवड करावी. 

बागायती जमिनीसाठी फुले रेवती, फुले वसुधा, सी एस व्ही १८, सी एस एच १५ व १९ या वाणांची निवड करावी. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

Soybean Seed Distribution: अनुदानावरील सोयाबीन बियाण्याचे वितरण सुरू

Jal Jeevan Mission: जलजीवन मिशन योजनेची कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका : रवींद्र खेबुडकर

Sangli Pre Monsoon Rain: सांगली जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

Rice Crop Management: चारसूत्री तंत्राने भात पिकाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT