Rabi Jowar: रब्बी ज्वारीसाठी पीकेव्ही क्रांतीचा पर्याय

रब्बी हंगामात अधिक उत्पदन देणारे मालदांडी - ३५ - १ या वाणाला पर्याय म्हणून एके एस व्ही १३ आर म्हणजेच पीकेव्ही क्रांती हे सरळ व शुद्ध वाण २००४ - २००५ या वर्षी राज्य पातळीवर प्रसारित झालेले आहे.
PKV Kranti Rabi Jowar
PKV Kranti Rabi Jowar Agrowon

महाराष्ट्रात ज्वारी लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ ५० टक्के क्षेत्र रब्बी ज्वारी लागवडीखाली आहे. रब्बी ज्वारीची (Rabi Jowar) पेरणी २५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान केली जाते. सध्या रब्बी हंगाम होऊ घातला आहे. ज्वारी हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. रब्बी ज्वारीपासून मिळणारे चांगले प्रतीचे धान्य जनावरांसाठी चांगला प्रतिचा चारा व धान्याला मिळणारा चांगला बाजारभाव या सर्व बाबी लक्षात घेऊन रब्बी ज्वारीचे पीक फायदेशीर मानले जाते. परंतु रब्बी ज्वारीचे उत्पादन खरीप ज्वारीच्या तुलनेत कमी येते. याचे मुख्य कारण म्हणजे खरीप हंगामात अनेक संकरित व शुद्ध वाण उपलब्ध आहेत तर रब्बी हंगामासाठी मोजकेच वाण उपलब्ध आहेत.

PKV Kranti Rabi Jowar
तंत्र रब्बी ज्वारी लागवडीचे...

ही गरज लक्षात घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ज्वारी संशोधन केंद्राने विकसीत केलेले रब्बी ज्वारीचे पीकेव्ही क्रांती म्हणजेच एके एस व्ही १३ आर हे वाण फायदेशीर ठरले आहे. रब्बी हंगामात अधिक उत्पदन देणारे मालदांडी - ३५ - १ या वाणाला पर्याय म्हणून एके एस व्ही १३ आर म्हणजेच पीकेव्ही क्रांती हे सरळ व शुद्ध वाण २००४ - २००५ या वर्षी राज्य पातळीवर प्रसारित झालेले आहे.

पीकेव्ही क्रांती वाणाची वैशिष्ट्ये काय आहेत?

हे वाण मध्यम कालावधीत तयार होणारे आहे. या वाणाचे कणीस आकाराने मोठे, दाणे मोत्यासारखे चमकदार ठोकळ आहेत.

हे वाण मध्यम ते भारी जमिनी करता उपयुक्त असून धान्याचे उत्पादन हेक्टरी २५ ते ३० क्विंटल तर कडब्याचे उत्पादन हेक्टरी ७० ते ७५ क्विंटल मिळते.

भाकरीची प्रत अतिशय उत्तम असून इतर गुणधर्मांमध्ये सुद्धा हा वाण मालदांडी - ३५ - १ सारखाच आढळून आलेला आहे.

सध्या रब्बी ज्वारीच्या उपलब्ध असलेल्या वाणांमध्ये हे वाण अधिक उत्पादन क्षमता असणारे तसेच चांगल्या प्रतीचे धान्य व कडब्याच्या उत्पादनासाठी झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

हे वाण रब्बी ज्वारीच्या इतर सुधारित वाणांपेक्षा अधिक उत्पादनक्षम व अनुवंशिक दृष्ट्या वेगळे आहे.

हे वाण मध्यम कालावधीत म्हणजेच १२० ते १२२ दिवसात परिपक्व होते.

मालदांडी ३५ - १ या वाणापेक्षा धान्याचे उत्पादन २० टक्क्यांनी तर कडब्याचे उत्पादन २९ टक्क्यांनी जास्त आहे.

हे वाण खोडकीड, खोडमाशी व कडा करपा या कीड, रोगासाठी बऱ्याच प्रमाणात प्रतिकारक आहे.

उत्पादनाकरिता सोपे व दरवर्षी बियाणे वापरता येते. मळणी सुलभपणे करता येते.

----------------

स्त्रोत - कृषी पत्रिका, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com