Which intercropping methods are beneficial for the rabi season?  Agrowon
ॲग्रो गाईड

Rabi Intercropping : रब्बी हंगामासाठी कोणत्या आंतरपीक पद्धती फायदेशीर?

रब्बी हंगामात कोरडवाहू परिस्थितीमध्ये नैसर्गिक घटकांचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी आंतरपीक आणि दुबार पीक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.

Team Agrowon

रब्बी हंगामात (Rabi Intercropping) कोरडवाहू (Rainfed) परिस्थितीमध्ये नैसर्गिक घटकांचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी आंतरपीक (Intercropping) आणि दुबार पीक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. मराठवाड्याच्या मृदा व पर्जन्यमानानुसार हमखास जास्त उत्पादन आणि नफा देणाऱ्या खालील आंतरपीक आणि दुबार पीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेल्या आहेत. 

रब्बी हंगामात सलग पिकाच्या ऐवजी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनामध्ये स्थिरता येते. तसेच हेक्टरी अधिक उत्पादन मिळून जास्त प्रमाणात नफा मिळतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने रब्बी हंगामासाठी पुढील शिफारशी केल्या आहेत.

रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धतीमध्ये रब्बी ज्वारी + हरभरा ६:३ आणि रब्बी ज्वारी + करडई ६:३ या आंतरपीक पद्धती अधिक आर्थिक फायदा देणाऱ्या आहेत. 

फायदेशीर आंतरपीक पद्धती कोणत्या आहेत?

१) रब्बी ज्वारी + करडई 

ही आंतरपीक पद्धती ज्या क्षेत्रात रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणात घेण्यात येते अशा क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. वातावरणातील उष्णतामानाच्या तफावतीमुळे ज्वारी अथवा करडई च्या सलग पिकात येणारी घट आंतरपीक पद्धतीत कमी होऊन उत्पादनात स्थिरता येते. ही आंतरपीक पद्धत ६:३ या ओळीच्या तासाच्या प्रमाणात घ्यावी. 

२) करडई + हरभरा 

मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. ४:२ अथवा ६:३ ओळीच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धत घेतल्यास जास्त फायदा होतो. 

दुबार पीक पद्धती 

ज्या जमिनीची खोली एक मीटर अथवा त्यापेक्षा जास्त आहे अशा जमिनीवर दुबारपीक पद्धत यशस्वीरित्या घेता येते. अशा जमिनीमध्ये खालील दुपार पीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे.  

खरीप मूग / उडीद / सोयाबीन -  रब्बी ज्वारी  / हरभरा / करडई 

खरीप संकरित ज्वारी - करडई / हरभरा / जवस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT