
परभणी ः यंदाच्या (२०२२) रब्बी हंगामात (Rabi Season) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात उत्पादित विविध पिकांचे मिळून सुमारे २ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी शनिवारी (ता. १७) यंदाच्या रब्बी हंगामातील बियाणे विक्रीचा प्रारंभ कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या हस्ते होणार आहे.
ज्वारीचे २०० क्विंटल, करडईचे ३०० क्विंटल उपलब्ध आहे. उगवण चाचण्यांच्या अहवालानंतर हरभऱ्याचे बियाणे टप्प्याटप्प्याने उपलब्ध होईल. विविध पिकांचे मिळून सुमारे २ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे सूत्रांनी सांगितले.या वाणांचे बियाणे होणार उपलब्ध...
यंदा हरभऱ्याच्या फुले विक्रम, बीडीएनके ७९८ या वाणांचे ज्वारीच्या परभणी मोती, परभणी ज्योती, परभणी सुपर मोती या वाणांचे, करडईच्या पूर्णा, पीबीएनस १२ या वाणांचे, गव्हाच्या समाधान या वाणांचे तरजवसाच्या लातूर ९३ वाणांचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.