Mumbai News : डहाणूतील धुंदलवाडी, नरेशवाडी येथील गिरीवनवासी प्रगती सेवा मंडळ संस्थेच्या प्रक्षेत्रावर संकरित जी-९ केळी लागवड करून विक्रमी उत्पादनासह परिसरातील शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. चार एकरवर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून शास्त्रीय पद्धतीने प्रति एकर तब्बल ४५ टनांचे उत्पन्न घेतले आहे. जळगाव जिल्ह्यात उत्पादित होणारी केळी ही आता डहाणूच्या मातीतही उगवून विक्रमी उत्पादन घेण्यात आले, असे संस्थेचे कृषी व्यवस्थापक ऋषिकेश खिलारी यांनी माहिती दिली..केळीच्या राेपांचे लागवड करताना प्रत्येक खड्ड्यात दोन किलो गांडूळ खत, ट्रायकोडर्मा आणि शेणखत भरण्यात आले. या सेंद्रिय घटकांमुळे पांढऱ्या मुळीची वाढ जलद होऊन केळीची वाढ जोमाने झाली. डिसेंबरमध्ये लागवड पूर्ण झाली होती आणि योग्य पोषण व्यवस्थापनामुळे नोव्हेंबर महिन्यात फळे पूर्णपणे तयार झाली. गिरीवनवासी प्रगती मंडळाच्या व्यवस्थापन पथकाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या शेती प्रकल्पामुळे इतर शेतकऱ्यांनाही सेंद्रिय शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे. मंडळ कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी बागेची पाहणी केली..Agrowon Podcast: केळीचे दर स्थिर, ज्वारीचे दर कायम, शेवगा तेजीत, हिरव्या मिरचीला उठाव तर गव्हाला मागणीचा आधार.बुंध्याजवळ इंजेक्शनपावसाळ्यात बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झाडांच्या बुंध्यात बुरशीनाशकाचे इंजेक्शन देण्यात आले. विद्राव्य खते झाडांना तत्काळ मिळावीत, म्हणून पोंगे भरणी करण्यात आली. तसेच केळीच्या फुगवणीत सुधारणा व्हावी, म्हणून पोटॅशयुक्त खतांची नियोजित फवारणी करण्यात आली. या शास्त्रीय उपाययोजनांमुळे केळीचा दर्जा व उत्पादनात लक्षणीय वाढ झाली..घडाचे वजन तब्बल ५० किलोसरासरी एका घडाचे वजन ३० किलो असते. म्हणजे एकरी उत्पादन ३६ क्विंटल होईल. या ठिकाणी एका घडाचे वजन ३५ ते ५० किलोपर्यंत आहे. डहाणू, वापी, कासा आणि धुंदलवाडी परिसरातील सर्व शाळांना पोषण आहारमधून केळीवाटप करत आहेत..Banana Crop Insurance: केळीचे जिओ टॅगींग न केल्यास विमा योजनेतील सहभाग रद्द.रोपे खरेदी : राम बायोटेक, जळगावरोपांचे वय : २५ दिवसप्रति रोप खरेदी : १८ रुपये घरपोचएका एकरावर लागवड : १२०० रोपेविक्रीची किंमत : १५०० ते २००० रुपये प्रतिटनसर्वसाधारणपणे उत्पादन : ४० टन.पालघर जिल्ह्यात केळी पिकाची लागवड असली तरीही व्यावसायिक दृष्टिकोनातून फारशी लागवड झालेली नाही. गिरी वनवासी संस्थेच्या प्रक्षेत्रावरील उत्पादन हे पालघर जिल्ह्यातील विक्रमी उत्पादन आहे.- जगदीश पाटील, कृषी अधिकारी, डहाणू.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.