Wardha News: केळीला मिळणारा बाजारभाव कोसळल्यानंतर वर्ध्यातील अनेक उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. पवनार येथील प्रयोगशील शेतकरी कुंदन वाघमारे यांनी डोळ्यांत पाणी आणणारा निर्णय घेत आपल्या तब्बल २० एकर केळी बागेवर नांगर फिरवत पीक काढून टाकले. .कुंदन वाघमारे यांनी मे महिन्यात आपल्या केळीला १८ रुपये किलो इतका दर मिळवला होता. त्यानंतरही बाजारात दर स्थिर राहील अशी अपेक्षा होती. मात्र काही महिन्यांतच परिस्थिती पूर्णपणे बदलली. निर्यातदारांनी खरेदी बंद केली, तर स्थानिक बाजारात देखील व भाव कोसळले. सध्या बाजारात व्यापारी केवळ ३ ते ४ रुपये किलो दराने केळी खरेदी करत आहेत. .Banana Rate: केळी उत्पादक शेतकरी हतबल; केळीला २ रुपये ते ७ रुपये दर.शेतातील उत्पादन खर्च, मजुरी, पाणी व्यवस्थापन, खते आणि बागेची देखभाल यावर मोठ्या प्रमाणात खर्च करूनही मिळणारा हा तुटपुंजा दर शेतकऱ्यांसाठी तोटा वाढवणारा ठरतो आहे. या दरात पीक काढणीचा खर्च देखील भागत नसल्याने वाघमारे यांना संपूर्ण बाग काढणे भाग पडले. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे बागेवर कोणताही रोग आला नव्हता, केळीची गुणवत्ता उत्तम होती आणि बाजारात मालही चांगल्या स्थितीत उपलब्ध होता. तरीदेखील व्यापाऱ्यांनी भाव पाडत शेतकऱ्यांना अडचणीत ढकलले. .दरवर्षी कुंदन वाघमारे हे केळी पिकातून ६० ते ७० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतात. प्रगत शेती, वैज्ञानिक पद्धती आणि काटेकोर व्यवस्थापनामुळे त्यांची बाग परिसरात आदर्श मानली जाते. प्रति एकर जवळपास एक लाख रुपयांचा खर्च येतो. यावर्षीही त्यांनी केळी पिकात २० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. .वर्षभरात दरात काही सुधारणा होण्याचीही शक्यता नाही. अशा स्थितीत बाग सांभाळली तर तोटा वाढणार, त्यामुळे पिकाला भावच नसेल तर ही बाग टिकवणे म्हणजे आर्थिक घसरण वाढवणे. म्हणूनच परिस्थितीचा नीट विचार करून हा कठोर निर्णय घ्यावा लागला.- कुंदन वाघमारे, प्रयोगशील शेतकरी, पवनार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.