Mumbai Redevelopment: मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईच्या पुनर्विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सरकारने पाऊल उचलले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी फी माफ करण्यात आली आहे..४०० चौरस फुटावरून ६०० चौरस फुटांपर्यंत नोंदणी फी माफ होईल. घराचे बांधकाम क्षेत्र २०० चौरस फूट वाढूनही नोंदणी फी माफ होणार आहे. याबाबत महसूल विभागाचे परिपत्रक जारी केले आहे..महसूल विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सदर परिपत्रकामुळे २०२५-२६ मधील वार्षिक मुल्यदर तक्त्यामध्ये घट किंवा वाढ होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तसेच या बदलामुळे वार्षिक मुल्यदर तक्त्यामध्ये सदर परिपत्रकामुळे घट/वाढ होत असल्यास ही वाढ/घट १ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध केले जाणाऱ्या वार्षिक मुल्यदर तक्त्यापुर्वी होणार नाही म्हणजेच या पुर्वी दिलेल्या निर्देशाचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी..Maharashtra Politics: 'उदय सामंत कोणत्याही क्षणी जवळचा गट घेऊन भाजपसोबत जातील'; अंधारेंच्या दाव्यानं खळबळ, नेमकं खरं काय?.विशेष म्हणजे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच दरम्यान राज्य सरकारने मुंबईतील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या पुनर्विकासासाठी घेतलेल्या या निर्णयाची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरील पोस्टमधून दिली आहे. .Kolhapur Politics: ‘अदृश्य शक्तीचा हात...; एकत्र आलोय, कायम एकत्र राहण्यासाठी’; कट्टर विरोधक मुश्रीफ-घाटगेंची युती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.