Irrigation Water Agrowon
ॲग्रो गाईड

Irrigation Water : ओलिताचे पाणी क्षारयुक्त किंवा विम्लधर्मी होण्याची कारणे काय आहेत?

Team Agrowon

Water Quality : पाण्यात क्षारांचे प्रमाण (Salt Quantity) वाढून पाणी समस्यायुक्त बनते. पाणी समस्यायुक्त बनण्याची विविध कारणे आहेत. समस्यायुक्त पाण्याने पिकाला ओलीत (Crop Irrigation) केल्यास त्याचे मातीच्या आरोग्यावर आणि पिकावर विपरीत परिणाम होतात.   तर समस्यायुक्त पाणी होण्याची कारणे काय आहेत याबद्दलची माहिती पाहुया. 

कमी पडणारा पाऊस 

कोरड्या आणि निमकोरड्या प्रदेशात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी असते. पडलेल्या पावसाच्या पाण्यात मातीतील क्षार विरघळतात. अशा भागात पडलेल्या पावसाच्या पाण्यापेक्षा बाष्पीभवन होणाऱ्या पाण्याची प्रमाण जास्त असते. त्यामुळे शिल्लक असलेले क्षार एकाच वेळी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसाच्या पाण्यात विरघळून ते भूपृष्ठाखाली झिरतात आणि पाणी क्षारयुक्त बनते.

ओलितासाठी पाण्याचा अमर्याद वापर 

ओलितासाठी अमार्याद प्रमाणात पाण्याचा वापर केल्यास अशा पाण्यात क्षार जास्त प्रमाणात असतील तर पाण्यातील क्षार आणि जमिनीतील क्षार हे एकत्र मिसळतात आणि ते पुन्हा भूपृष्ठात झिरपणाऱ्या पाण्यात विरघळतात आणि परिणामी पाणी क्षारयुक्त किंवा विमलधर्मी बनते.

मातीमधील सेंद्रिय कर्बाचे कमी झालेले प्रमाण 

सेंद्रिय कर्बामध्ये मातीमधील विद्राव्य क्षार काही प्रमाणात धरून ठेवण्याची क्षमता असते. मातीमधील या सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाल्यामुळे ओलिताच्या पाण्यामधून जमिनीत मिसळलेल्या विद्राव्य क्षारांचे विनियम योग्य प्रमाणात होत नाही. पर्यायाने असे क्षार वाढून ते पाण्यात विरघळतात व पाणी क्षारयुक्त बनते.

रासायनिक खतांचा शिफारशीपेक्षा जास्त किंवा असंतुलित प्रमाणात वापर 

पिकाला देण्यासाठी वापरली जाणारी रासायनिक खते जास्त प्रमाणात किंवा असंतुलित प्रमाणात वापरल्यामुळे देखील मातीमधील खनिजांचे संतुलन बिघडते आणि क्षारांचे प्रमाण वाढून पाणी समस्यायुक्त होऊ शकते.

भूपृष्ठाखालील लोकांची क्षारयुक्त जडणघडण 

आजूबाजूच्या परिसरातील पाणी चांगले असले तरी एखाद्या ठिकाणी विहिरीला किंवा कुपनलीकेला क्षारयुक्त किंवा विम्लधर्मी पाणी लागल्याची उदाहरणे आहेत. याचे कारण म्हणजे त्या ठिकाणी भूपृष्ठात असलेले खडक हे अशा विद्राव्य क्षारांचे बनलेले असतात.  अशा खडकांमधून आलेल्या पाण्याच्या झऱ्यात खडकांमधील क्षार विरघळून त्या जागेचे पाणी क्षारयुक्त किंवा विम्लधर्मी बनते 

भौगोलिक परिस्थिती

काही विशिष्ट भागातील भौगोलिक परिस्थिती आणि इतिहासानुसार भूगर्भातील पाणी निसर्गातच क्षारयुक्त आढळून येते समुद्राच्या खाडीमधील व आसपासचा क्षेत्रातील भूगर्भातील पाणी क्षारयुक्त आढळते. 

स्त्रोत - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT