Irrigation Water : पाणी क्षारयुक्त कसे बनते?

Team Agrowon

योग्य प्रमाणात ओलावा आवश्यक

पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषक द्रव्ये पिकाला मातीमधून उपलब्ध होतात. त्यासाठी जमिनीत विशिष्ट आणि योग्य प्रमाणात ओलावा असण आवश्यक असतं.

Irrigation Water | Agrowon

माती आणि पाणी हे दोन्ही घटक आवश्यक

मातीमध्ये हा ओलावा टिकून राहावा यासाठी माती सोबत पाण्याची सुद्धा तितकीच आवश्यकता असते. म्हणजेच पाण्याशिवाय नुसती माती आणि मातीशिवाय नुसते पाणी हे शेती करण्यासाठी उपयोगाचे नाही. शेती करण्यासाठी माती आणि पाणी हे दोन्ही घटक आवश्यक असतात. 

Irrigation Water | Agrowon

क्षारयुक्त पाणी

ज्या पाण्यामध्ये कॅल्शिअम आणि मॅन्गेशियम यासारख्या खनिज क्षारांचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक वाढलेले असते, त्यावेळी ते पाणी क्षारयुक्त किंवा मचुळ बनते.

Irrigation Water

क्षारयुक्त पाण्यातील घटक

क्षारयुक्त पाण्यात लोह व मॅगनीज यांचे सल्फेटस् तसेच सोडियम, कॅल्शियम आणि मॅन्गेशियम यांचे क्लोराईड आणि बायकार्बोनेटस् हे मोठ्या प्रमाणात आढळतात. 

Irrigation Water | Agrowon

विम्लधर्मी पाणी

विम्लधर्मी पाण्यात लोह व मॅगनीज यांचे सल्फेटस् तसेच सोडियम, कॅल्शियम आणि मॅन्गेशियम यांचे क्लोराईड आणि बायकार्बोनेटस् या विद्राव्य क्षारांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे सोडियमचे बायकार्बोनेटस् या पाण्यात जास्त असतात.

Irrigation Water | Agrowon

कॅल्शियम आणि मॅन्गेशियम क्षार

कॅल्शियम आणि मॅन्गेशियम या क्षारांचे सुद्धा कार्बोनेट तयार होतात आणि जमिनीत स्थिर किंवा अचल राहतात.

Irrigation Water | Mukund Pingle

पडणाऱ्या पावसाचे प्रमाण

पडणाऱ्या पावसाचे प्रमाण खूप कमी असल्यास जमिनीच्या पृष्ठभागावर जमा होणारे क्षार घुऊन न जाता ते तसेच साचत राहतात.

Irrigation Water | Agrowon
Cashew | Agrowon