Agricultural Warehouse Agrowon
ॲग्रो गाईड

Agricultural Warehouse : गोदाम पावती विषयक विमाबाबत तुम्हाला माहितेय का?

प्राधिकरणाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार विमाविषयक नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. या व्यवसायात गोदाम विमा आणि गोदामातील साठा केलेल्या मालाचा विमा काढण्याची प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

मिलिंद आकरे, हेमंत जगताप 

मिलिंद आकरे, हेमंत जगताप

Agricultural Warehouse : शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Producers Company), सहकारी संस्था व महिला बचत गटाचे फेडरेशन या सर्व समुदाय आधारित संस्थानी विविध योजनांमधून उभारलेले गोदाम पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी गोदाम पावती (Warehouse receipt) हा यापुढील काळात उत्तम पर्याय आहे.

गोदाम पावती योजना राबविण्यास सुरुवात करण्यापूर्वी वखार विकास व नियामक प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गोदामाचे प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे.

या प्रमाणीकरण नोंदणीपूर्वी प्राधिकरणाने दिनांक २७.०४.२०१७ रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार विमाविषयक नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. या व्यवसायात गोदाम विमा आणि गोदामातील साठा केलेल्या मालाचा विमा अशा दोन प्रकारच्या विमा काढण्याची प्रक्रिया करणे गरजेचे आहे.

सद्यःस्थितीत गोदामातील साठा केलेल्या मालाचा विमा काढण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे.

कलम ११ (१) (क) गोदाम (विकास व नियमन) अधिनियम कायदा २००७ आणि वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाचे कलम ४(२) (निगोशिएबल वेअरहाउस पावत्या) विनियमन २०११, प्रमाणे प्राप्त अधिकारानुसार गोदाम हस्तांतरीय व अहस्तांतरीय पावत्यांवर आग, पूर, चोरी, घरफोडी, गैरव्यवहार, दंगली, संप किंवा दहशतवाद इत्यादींतून नुकसान भरपाई देणाऱ्या विमा कंपनीचे नाव असावे.

१) गोदाम (विकास आणि नियमन) अधिनियम कायदा कलम १७, गोदाम नोंदणीचे नियम २०१७ नुसार गोदामाची नोंदणी किंवा गोदाम नोंदणी नूतनीकरण तोपर्यंत करता येणार नाही, जोपर्यंत प्राधिकरणाने सुचविलेल्या आवश्यकतेनुसार व पात्रतेनुसार गोदामाचा पुरेसा विमा उतरविला जात नाही.

अर्जदाराने, गोदामाचे विमा संरक्षण आग, पूर, घरफोडी, गैरव्यवहार, दंगल, संप, दहशतवाद घटकांपासून संरक्षण मिळण्याच्या अनुषंगाने करणे आवश्यक आहे.

२) गोदाम (विकास आणि नियमन) अधिनियम कायद्यातील कलम १७ गोदाम नोंदणीचे नियम २०१७ नुसार गोदामाची नोंदणी किंवा गोदाम नोंदणी नूतनीकरणाकरिता गोदाम इमारत विमा बंधनकारक नाही, असा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.

यामुळे वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाद्वारे प्रसारित केलेल्या पूर्वीच्या परिपत्रक क्रमांक ०१/तांत्रिक-II/२०१६ दिनांक ०६.०४.२०१६, नुसार विमा मानदंडाच्या अधिमानात खालील प्रसंग उद्‍भवू नये याकरिता साठवलेल्या मालाच्या संदर्भात अर्जदार/ गोदामधारकांनी विमा पॉलिसी घेणे आवश्यक आहे किंवा त्यांच्या नोंदणीच्या उद्देशाने गोदामात माल साठविण्याकरिता विमा पॉलिसी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

अ) आग लागण्याबाबतची मानके आणि विशेष संकटे पॉलिसी :

१) उपरोक्त पॉलिसीअंतर्गत साठवणूक विमा एकतर घोषणापत्र किंवा विना- घोषणापत्र या धर्तीवर घेतला जाऊ शकतो.

२) विमापॉलिसीमध्ये किमान एक विमा पॉलिसीची एकूण कव्हरेज रक्कम एक कोटी रुपये असून, ती एक किंवा अधिक ठिकाणांवरील गोदामांसाठी असावी. त्यापैकी एका ठिकाणावरील विम्याची कव्हरेज रक्कम किमान २५ लाखांपेक्षा कमी नसावी.

३) एका गोदामातील साठवणूक केलेल्या मालाची एकूण किंमत १ कोटीपेक्षा कमी असेल, तर या पॉलिसीमध्ये घोषणापत्राच्या सुविधेशिवाय तरतूद करण्यात आलेली आहे.

१) घोषणापत्र पॉलिसी ः

- घोषणापत्र पॉलिसीच्या बाबतीत, गोदामातील साठ्याचे सरासरी मूल्य २०,००० रुपये प्रति टन असेल आणि गोदामाच्या क्षमतेचा सरासरी ६० टक्के वापर यात गृहीत धरण्यात येतो.

- गोदामाच्या मालकाला व केंद्रप्रमुखाला साठ्याचे वास्तविक मूल्य दर महिन्याला विमा कंपनीला कळविणे बंधनकारक असून, गोदाम

साठ्यातील मूल्याच्या किमतीतील उच्च आणि कमी असे बदल अशा फरकाबाबत विमा कंपनीमार्फत काळजी घेतली जाते.

२) गैर-घोषणापत्र पॉलिसी ः

- गैर-घोषणापत्र पॉलिसीच्या बाबतीत, गोदामात साठविण्यात येणारा माल किंवा साठविण्यासाठी प्रस्तावीत माल हा गहू, तांदूळ/धान, जव, ओट, मका, ज्वारी आणि बाजरी हा असेल तर गोदामातील सरासरी मूल्यसाठा २०,००० रुपये प्रति टन रुपये म्हणून गृहीत धरला जातो.

- या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या बाबतीत, साठ्याचे मूल्य साठवलेल्या/ साठवायच्या वस्तूंच्या सरासरी किमतीच्या आधारे मोजले जाईल. गैर-घोषणापत्र पॉलिसीच्या बाबतीत, विम्याची रक्कम (१०० टक्के) गोदाम क्षमतेचा वापराच्या आधारावर मोजली जाते.

३) विमा पॉलिसीकरिता नवीन गोदामांसाठी वेगळी अट असणार नाही. वरीलप्रमाणे १ किंवा २ नुसार नियमांचे पालन करावे लागेल.

४) एकापेक्षा जास्त गोदाम चालवणाऱ्या गोदामांसाठी, पॉलिसीच्या प्रकारानुसार व वरीलप्रमाणे १ किंवा २ नुसार फ्लोटर आधारावर विमा उतरवला जाईल.

५) दहशतवादाचे कवच अशा भागातील गोदामांना आवश्यक असेल, की जो भाग आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट (AFSPA) अंतर्गत अधिसूचित असेल.

ब) चोरीविषयक विमा ः

घरफोडी बाबत/ गोदाम फोडीबाबत विमा पॉलिसीची गरज खालील प्रमाणे ः

अनु. क्र. --- तपशील ----एकूण किंमत (एकूण विमा मूल्य)

१. ---५००० टनांपर्यंत साठवणूक क्षमता ---२० टक्के मूल्यापर्यंत साठा

२. ---५००१-२५००० टन --- २ कोटी रुपये+ ५००० टन क्षमतेपेक्षा जास्त साठ्याच्या मूल्याच्या १० टक्के.

३. ---२५००१-५०००० टन ---६ कोटी रुपये + २५००० टन क्षमतेपेक्षा जास्त साठ्याच्या मूल्याच्या ५ टक्के.

४. ---५०००१-१००००० टन --- ८.५ कोटी रुपये + ५०००० टन क्षमतेपेक्षा जास्त साठ्याच्या मूल्याच्या ०.२५ टक्का.

५. ---१ लाख टनापेक्षा जास्त क्षमता ---८.७५ कोटी रुपये+ १ लाख टन क्षमतेपेक्षा जास्त साठ्याच्या मूल्याच्या ०.१५ टक्का आणि जास्तीत जास्त रुपये १५ कोटींपर्यंत.

टीप ः विमा रकमेच्या मूल्याची एकूण रक्कम ही गोदामातील मालाच्या २०,००० रुपये प्रति टन अशी गृहीत धरण्यात येते. परंतु मालाची किंमत यापेक्षा जास्त असेल, तर विमा काढताना बाजारातील किंमत गृहीत धरण्यात येते.

क) फिडेलिटी गॅरंटी विमा पॉलिसी :

फिडेलिटी गॅरंटी विमा पॉलिसीची आवश्यकता खालीलप्रमाणे विभागलेली आहे.

अनु क्र. ---तपशील ---एकूण किंमत (एकूण विमा मूल्य)

१.---१ लाख टनांपर्यंत क्षमतेची गोदामे ---१० टक्क्यांपर्यंत आग लागण्याच्या धोरणानुसार विमा मूल्य अथवा जास्तीत जास्त रुपये २० कोटींपर्यंत.

२.---१ लाख टनापेक्षा जास्त क्षमतेची गोदामे---रुपये २० कोटी

१) अर्जदार किंवा गोदाममालक प्रति गोदाम प्रति कामगाराच्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी असलेली गोदामे यांची एकत्रितरीत्या फिडेलिटी गॅरंटी विमा पॉलिसी घेऊ शकतो. तसेच फिडेलिटी गॅरंटी विमा पॉलिसी ही एकत्रितरीत्या सर्व कामगारांची यादी तयार करून सुद्धा घेता येऊ शकते.

२) शीतगृहाच्या बाबतीत वरील तीनही पॉलिसींव्यतिरिक्त विजेच्या जाण्यामुळे शीतगृहात ठेवलेल्या मालाचे होणारे नुकसान तसेच आतील यंत्रणेचे आग व इतर संकटांमुळे होणारे नुकसान याकरिता सुद्धा स्वतंत्र विमा पॉलिसी घेता येऊ शकते.

३) गोदाम सेवा देणाऱ्यांच्या बाबतीत किंवा गोदाम सेवा पुरवठादारांच्या बाबतीत (WSPs) एकापेक्षा जास्त गोदामे असल्याने प्रत्येक गोदामाचे नाव, पत्ता आणि क्षमता असलेली यादी पॉलिसी दस्तऐवजात समाविष्ट करणे आवश्यक असते.

तसेच गोदाम सेवा पुरवठादारांच्या (WSPs) बाबतीत जोपर्यंत सर्व गोदामांची एकूण क्षमता पॉलिसीमध्ये समाविष्ट होत नाही तोपर्यंत गोदाम क्षमतेबाबत स्वतंत्रपणे वेगळी पॉलिसी किंवा धोरण बनविण्यात येत नाही.

गोदामधारकाचे घोषणापत्र ः

- या प्रकारामध्ये विमा कंपन्यांना सादर केलेल्या साठ्याचे मूल्यांकन आग लागण्याबाबतची मानके आणि विशेष संकटे पॉलिसीच्या अंतर्गत असेल तर वखार विकास व नियामक प्राधिकरणाला गोदामातील स्टॉक बाबत मासिक माहिती द्यावी.

- गोदामातील साठ्याचे मूल्य वाढलेले असेल आणि त्यामुळे प्रसंगी घेतलेल्या अतिरिक्त विमा संरक्षणाची प्रत देखील प्राधिकरणास सादर करावी.

- केंद्रप्रमुखाने अथवा गोदाम मालकाने वरील प्रमाणे विमा संरक्षण प्रक्रिया पूर्ण करावी. वखार विकास व नियामक प्राधिकरण, गोदाममालकाने स्वत: उभारलेल्या निधीने अथवा स्वत: निर्माण केलेली विमा पॉलिसी गोदाम पॉलिसी म्हणून गृहीत धरीत नाही.

संपर्क ः प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०, (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT