Warehouse Management : गोदाम व्यवस्थापनच्या कश्या करणार उपाययोजना?

वखार केंद्रप्रमुखाला एखादी तक्रार दाखल करायची असेल तर प्रथम त्याची नोंद करावी. जर वखार केंद्रावरील कामकाजाबद्दल तक्रार दाखल करायची असेल तर पुरेशा पुराव्यासहित केंद्रप्रमुख किंवा त्याच्या प्रतिनिधींकडे करता येते.
Agriculture Warehouse
Agriculture Warehouse Agrowon

Agricultural Warehouse : वखार केंद्रावर चोरी झाल्यास कर्मचाऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये २४ तासांच्या आत कळवावे. गोदामात (Warehouse) चोरी, जबरी चोरी झाल्यास काय करावयाचे याची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना असावी. पोलिसात तक्रार केल्यावर ‘एफआरआय’ची प्रत द्यावी.

चोरीबद्दलची माहिती विमा कंपनीस (Insurance Company) ताबडतोब कळवावी. चोरी झाल्यावर विमा कंपनीला चोरीच्या विनंतीची कल्पना द्यावी.

महत्त्वाचे मुद्दे ः

१. पोलिस स्टेशनला माहिती दिल्याची प्रत

२. ‘एफआरआय’ची प्रत.

३. काय घडले याची थोडक्यात माहिती.

४. गोदामाचे स्थान.

५. चोरी झाल्यामुळे झालेले नुकसान.

६. विम्याची प्रत.

७. चोरी झाल्यावर तेथील छायाचित्र.

८. वर्तमानपत्रातील कात्रणे.

९. फायर ब्रिगेड किंवा पोलिस स्टेशनचे शिफारस पत्र

१०. ज्या गटातून चोरी झाले त्याचे रेकॉर्ड.

Agriculture Warehouse
Ware housing : गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन

तक्रार दाखल करावयाची पद्धती ः

१. वखार केंद्रप्रमुखाला एखादी तक्रार दाखल करायची असेल, तर प्रथम त्याची नोंद करावी.

२. वखार केंद्रावरील कामकाजाबद्दल तक्रार दाखल करायची असेल, तर पुरेशा पुराव्यासहित केंद्रप्रमुख किंवा त्याच्या प्रतिनिधींकडे करता येते.

३. ज्या ठेवीदारांकडे इलेक्ट्रॉनिक वखार पावती असेल त्याला साठ्याची जावक घेण्याबाबत ३० दिवसांच्या आत प्रक्रिया करावयाची असते.

४. वखार केंद्राच्या तक्रार दाखल केल्याची पावती द्यायची असते, पोहोचपावती घेण्याची पद्धत ः

अ- तक्रार दाखल केल्याची तारीख

ब- तक्रारीसंदर्भात संदर्भ क्रमांक

क- तक्रार दाखल करावयाची श्रेणी

५. ठेवीदाराने दाखल केलेल्या तक्रारीची दखल वखार केंद्रप्रमुखाला १५ दिवसांत घ्यावी.

६. वखार केंद्रप्रमुखाने तक्रारनिवारणासंदर्भात खुलाशाखाली नमूद केलेल्या शर्तीचा समावेश असेल.

१- वखार केंद्रप्रमुखाने तक्रारनिवारणासंदर्भात केलेली कारवाई

ब- केंद्रप्रमुखाला तक्रारीबद्दल जर उत्तर द्यायचे असेल, तर त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.

७. तक्रारदाराला तक्रारीबाबत केंद्रप्रमुखाने दिलेल्या स्पष्टीकरणाशी सहमत नसेल, तर तक्रार १० दिवसांत केंद्रप्रमुखाला कळवेल.

८. तक्रारदाराला केंद्र प्रमुखाने दिलेले स्पष्टीकरण मान्य नसेल, तर त्याला कारणमीमांसा द्यावी लागेल.

९. केंद्रप्रमुखाला तक्रारदाराने पुनश्‍च दाखल केलेल्या तक्रारीचे स्पष्टीकरण १० दिवसांत दाखल करावयाला लागेल.

१०. केंद्र प्रमुखाचे स्पष्टीकरण जर तक्रारदाराला मान्य नसेल, तर ते प्रकरण चिघळून या संबंधित असलेल्या सरकारी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करावी लागते.

कर्मचाऱ्याचा सहभाग, कर्मचाऱ्यांची जबाबदारी याबाबत मनुष्यबळाचे रेकॉर्ड ः

१. वखार केंद्रप्रमुख गोदामात किती कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांचे रेकॉर्ड ठेवून त्यांच्या कामाचे व्यवस्थापन करतील.

२. गोदामात लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कामकाज बघून ठरवावी.

३. वखार केंद्रावर लागणारे कर्मचारी हे गोदामाच्या क्षमतेप्रमाणे असावेत. याबाबत तपशील खालील तक्त्यात नमूद केला आहे.

गोदाम क्षमतेप्रमाणे कर्मचारी ः

अ.क्र.--पद ---वखार केंद्राची क्षमता (टन)

------५००० टनांपर्यंत---१०,००० टनांपर्यंत---१०,००० ते २५,००० टनांपर्यंत ---२५,००० टनांच्या वर

१ ---केंद्रप्रमुख---१ ---१ ---१ ---१

२ ---प्रत नियंत्रण कर्मचारी---१ ---२ ---२ ---२ ---३

३---गोदाम सहाय्यक ---१ ---२ ---३ ---४ ---४

४---पहारेकरी ---४ ---४ ---६ ---८

४. वखार केंद्रावर अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, की जे त्यांना सोपविलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतील

५. वखार केंद्रावरील कर्मचारी यांना प्रत नियंत्रण करण्याचे ज्ञान हवे.

६. वखार केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना नामांकित संस्थेकडून प्रशिक्षण देण्यात यावे.

Agriculture Warehouse
Warehousing : गोदाम व्यवसायासाठी शेतकरी कंपन्यांची क्षमता बांधणी

वखार केंद्रावरील कर्मचाऱ्यांची जबाबदारी ः

१) केंद्रप्रमुखाची जबाबदारी ः

१. केंद्रप्रमुख सर्व वखार केंद्रावरील कामकाजावर नियंत्रण ठेवतील. सर्व कामकाजाची जबाबदारी सांभाळतील.

२. सर्व साठ्याच्या संरक्षक तथा प्रत नियंत्रणाची जबाबदारी सांभाळतील, तसेच सर्व साठ्याचा विमा उतरवला आहे की नाही.

३. वखार केंद्रावर कामकाज करताना सर्व ठेवीदारांशी व बँकेशी संपर्क ठेवतील.

४. सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी टाकून सर्व कामकाजावर नियंत्रण व समन्वय साधतील.

५. वखार केंद्रावर काहीही अप्रिय घटना घडली, तर त्याचे व्यवस्थित निराकरण करतील.

६. वखार केंद्रासंबंधी सर्व जबाबदारी व पैशाचे व्यवहार व्यवस्थित सांभाळतील.

Agriculture Warehouse
Agricultural Warehouse : गोदामात माल ठेवताना काय काळजी घ्यावी?

प्रत नियंत्रण ठेवणारा कर्मचारी :

१. वखार केंद्रावरील साठ्यातून दर पंधरवड्याला नमुना काढणे व कीड तपासावी.

२. थप्पीच्या नमुन्याचे पृथक्करण करणे. तो ‘एफएसएसएआय’च्या नियमाप्रमाणे आहे की नाही हे तपासावे.

३. दर पंधरा दिवसांनी कीड तपासणी करावी.

४. वखार केंद्रावर फवारणी व धुरीकरण करावी.

५. वखार केंद्रावर धुरीकरण करून सर्व साठा कीडमुक्त करावा.

६. गोदामात साफसफाई करावी.

७. सर्व साठ्यांचे मोजमाप करावे.

८. गोदामातील साठ्याची जावक होताना तपासणी करावी.

वखार केंद्रावरील सहाय्यक कर्मचारी ः

१. वखार केंद्रावरील आवक जावक करताना लेखाजोखा ठेवावा. सर्व गटांची थप्पी कोठे मारली आहे, यावर लक्ष ठेवावे.

२. डिलिव्हरी फॉर्मवर सही करावी.

३. गोदामात आलेल्या साठ्याची थप्पी करावी.

४. सर्व साठ्यांचे आवक व जावक याचा लेखाजोखा ठेवावा. सर्व गटांची थप्पी कोठे मारली आहे, त्यावर लक्ष ठेवावे.

५. गटांची जावक होताना थप्पीप्रमाणे लक्ष ठेवावे.

६. गोदामातील अंतर्गत वाहतुकीवर लक्ष ठेवावे.

७. गोदामातील आवक जावक संबंधी रेकॉर्ड ठेवावे.

८. सर्व साठ्यांचा अवधी तपासून बिल तयार करणे. बिलासाठी पाठपुरावा करावा.

संरक्षण कर्मचारी

१. वखार केंद्रावरील सर्व साठ्यावर लक्ष ठेवावे. चोरीपासून बचाव करावा.

२. वखार केंद्रावर येणाऱ्या ट्रकची तपासणी करावी.

३. गोदामातील सर्व दारांची कुलपे उघडताना व बंद करताना तपासणी करावी.

४. वखार केंद्रावरील सीसीटीव्हीचे अवलोकन करून संशयास्पद घटना घडली असेल, तर केंद्रप्रमुखांना अवगत करणे.

५. एका पाळीच्या नंतर दुसऱ्या पहारेकऱ्याला कार्यभार सोपविताना काही संशयास्पद घटना आढळल्यास दुसऱ्या पहारेकऱ्याला सांगणे.

६. वखार केंद्रावरील आगप्रतिबंधक उपकरणांची माहिती घेणे. ती सुस्थितीत आहे की नाही हे तपासणे.

वखार केंद्रावरील कंत्राटी कर्मचारी ः

१. वखार केंद्रावर कंत्राटी कर्मचारी ज्या संस्थेने नेमले असतील त्याचे रेकॉर्ड ठेवावे.

२. कंत्राटी कर्मचारी पुरवठा करणाऱ्या संस्थेचे कागदपत्र तपासणी करावी.

३. कंत्राटी कर्मचारी वर्गाचा पुरवठा करणारी कंपनीचे आर्थिक नियोजन आहे की नाही हे तपासावे.

४. वखार केंद्रावर धर्मकाटा नसेल तर बाहेरील वजनकाटा बरोबर आहे की नाही हे तपासणे. वेळेवर स्टॅम्पिंग करावे.

संपर्क ः प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com