Animal Care
Animal Care Agrowon
ॲग्रो गाईड

Animal Care : जनावरांच्या आजारांवर कोरफड, गोखरु, हळद गुणकारी

Team Agrowon

डॉ. अर्चना पाटील, डॉ.मत्स्यगंधा पाटील

बऱ्याच आजारांवर पशुपालक (Animal Husbandry) घरच्याघरी उपचार करू शकतात. यासाठी वनौषधी वनस्पतींचा वापर उपयुक्त ठरतो. मात्र विशिष्ट आजारावरील उपचार पशुवैद्यकाद्वारेच करावेत. वनौषधींचा वापर केल्यानंतर त्याचा कोणताही अंश पशुजन्य उत्पादनात आढळून येत नाही.

त्यामुळे मानवी आरोग्यावर त्यांचा कोणताही परिणाम होत नाही. जनावरांच्यामध्ये औषधी वनस्पती प्रामुख्याने बाह्य आणि आंतरिक उपचारासाठी वापरल्या जातात.

अग्निशिखा ः

१) जनावरांच्या प्रजननक्षम संप्रेरकाच्या स्त्रावासाठी उत्तेजक.

गोखरुः

१) मूत्र संस्थेवर कार्य करते. काटेरी फळांमध्ये भाकड जनावर माजावर येण्यासाठी आवश्यक इस्ट्रोजन संप्रेरकाची निर्मिती करण्याची क्षमता.

पुत्र जीवा ः

१) गर्भ काळात आवश्यक असणाऱ्या संप्रेरकांची निर्मिती करण्यास उपयोगी. गर्भाच्या वाढीला सहकार्य.

शिलाजीत ः

१) शुक्राणूची दुर्बलता, मधुमेह, मूत्रसंस्थेचे विकार इत्यादी आजारावर अत्यंत उपयुक्त.

२) सेवनामुळे शुक्राणू व वीर्यामध्ये वाढ होणारे संप्रेरक उपलब्ध होऊन दुर्बलता कमी होते.

औषधी वनस्पती वापरण्याच्या पद्धती :

१) ताज्या औषधी वनस्पती बारीक कापून जनावरांच्या खाद्यात मिसळाव्यात.

२) बाह्य त्वचेवर उपचारासाठी ताज्या वनौषधीची पेस्ट वापरावी.

३) वाळलेल्या औषधी वनस्पतींची भुकटी करून खाद्यात मिसळावी.

४) वनौषधीची भुकटी पाण्यासोबत अर्क बनवून जनावरांना पाजावी. अशी औषधे पाजताना कोमट पाणी वापरल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. किडलेली वनौषधी वापरू नये.

आजारांवर घरगुती उपाय ः

१) तोंड येणे, तोंडखुरी :

- हळद १५ ग्रॅम, कोरफड ५ ग्रॅम, जेष्ठमध ४ ग्रॅम, अर्जुन साल १० ग्रॅम, कात २ ग्रॅम, तुळस ५ ग्रॅम, जखम जोडी ५ ग्रॅम, कडुलिंब तेल ४ मिलि, गेरू ५ ग्रॅम

- सर्व औषधी बारीक करून त्यात पाणी मिसळून त्याचा लेप तोंडात द्यावा.

२) पोट गच्च होणे :

हिरडा ३० ग्रॅम , आवळा २० ग्रॅम, एरंडतेल २० मिलि, मुरुडशेंग १५ ग्रॅम, सोनामुखी १५ ग्रॅम.

- सर्व वनस्पती बारीक मोठ्या जनावरांत १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

३) पोटफुगी:

-ओवा २० ग्रॅम, धणे १० ग्रॅम, जिरे १५ ग्रॅम, बडीशेप १० ग्रॅम, हळद १५ ग्रॅम, काळे मीठ ३० ग्रॅम.

पोटदुखी:

- पिंपळी ५ ग्रॅम, जिरे१५ ग्रॅम, सुंठ किंवा आले २० ग्रॅम, ओवा ३० ग्रॅम, चित्रक ५ ग्रॅम, काळीमिरी ५ ग्रॅम, वावडींग १० ग्रॅम, हिरडा २० ग्रॅम.

- सर्व वनस्पती बारीक करून मोठ्या जनावरांत २० ते ३० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

४) अन्न न खाणे :

- चित्रक ५ ग्रॅम, पिंपळी ५ ग्रॅम, सुंठ किंवा आले १० ग्रॅम, आवळा २० ग्रॅम, जिरे १० ग्रॅम , ओवा १०ग्रॅम, काळे मीठ २५ ग्रॅम.

- सर्व घटक बारीक करून मोठ्या जनावरांत २० ते ३० ग्रॅम, लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

५) अतिसार (हगवण) :

- कुडा ३० ग्रॅम , बेल २० ग्रॅम, डाळिंब साल २० ग्रॅम, कात ५ ग्रॅम, बाभळीचा डिंक २५ ग्रॅम.

- सर्व घटक बारीक करून मोठ्या जनावरांत २० ग्रॅम व लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

श्वसनसंस्थेचे आजार

१) सर्दी, खोकला, ठसकणे ः

- अडुळसा ३० ग्रॅम, तुळस २० ग्रॅम, कंटकरी १० ग्रॅम, काळे मिरे १० ग्रॅम, सुंठ किंवा आले १० ग्रॅम, कासणी २० ग्रॅम.

- सर्व घटक बारीक करून मोठ्या जनावरांना २० ते ३० ग्रॅम, लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून दोन वेळेस द्याव्यात.

- कापूर ४ ग्रॅम, पुदिना ५ ग्रॅम , निलगिरी तेल २० मिलि , विंटर ग्रीन तेल २० मिलि.

- एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात तेलाचे ५ ते १० थेंब टाकून त्याची वाफ जनावरास द्यावी.

प्रजननसंस्थेचे आजार

१) जनावर माजावर न येणे :

- कोरफड २० ग्रॅम, बांबू पाने २० ग्रॅम, गोखरू १५ ग्रॅम, हिसबोळ १० ग्रॅम, अशोक २० ग्रॅम, तगर ५ ग्रॅम, उलट कंटल १० ग्रॅम.

- सर्व घटक बारीक करून मोठ्या जनावरांना २० ते ३० ग्रॅम, लहान जनावरांना १० ग्रॅम दिवसातून एक वेळेस तीन दिवस द्यावे.

२) गर्भ न राहणे :

- दुर्वा २५ ग्रॅम, कमळ बी २५ ग्रॅम, शिंगाडा २५ ग्रॅम, पुत्रंजीवा २५ ग्रॅम.

- सर्व घटक बारीक करून मोठ्या जनावरांना २० ग्रॅम द्यावे. जनावरांत कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतन केल्यापासून दोन महिन्यांपर्यत द्यावे.

- लहान जनावरात १० ग्रॅम दिवसातून एक वेळेस २० दिवसांपर्यंत खाद्यातून द्यावे.

संपर्क ः डॉ.अर्चना पाटील, ८५५२८३५३९५६ (पशुवैद्यकीय महाविद्यालय,उदगीर,जि.लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT