Animal Market : शिरपुरात पशुपालक मालामाल

पशुबाजारात अश्‍वबाजार हे खरेदीदारांसह नागरिकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. सोमवारी (ता. १३) तेथे यंदाच्या बाजारातील सर्वाधिक मोठ्या रकमेचा व्यवहार झाला.
Animal Market
Animal MarketAgrowon

Dhule News : श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त (Yatra) बाजार समितीच्या (Bajar Samiti) आवारात भरवलेल्या पशुबाजारात (Animal Market) गुरांच्या खरेदी-विक्रीतून आजअखेर सुमारे सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. विशेषत: बैल आणि घोड्यांना अधिक मागणी असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Animal Market
Lumpy skin : वडगाव जनावरे बाजार बंद असल्याने नुकसान

पशुबाजारात अश्‍वबाजार हे खरेदीदारांसह नागरिकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. सोमवारी (ता. १३) तेथे यंदाच्या बाजारातील सर्वाधिक मोठ्या रकमेचा व्यवहार झाला.

अजहरखान इकबाल मोहंमद (रा. धौरातांडा, ता. बरेली, उत्तर प्रदेश) यांच्या मालकीचा उमदा अश्‍व शहादा येथील विशाल लक्ष्मण अहिरे यांनी अडीच लाख रुपये किमतीला खरेदी केला.

अहिरे यांच्याकडे अश्‍व सुपूर्द करताना बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, यात्रा उपसमितीचे सभापती अविनाश पाटील, संचालक राजकपूर मराठे, नरेश पाटील, राजेंद्र पाटील, मोहन पाटील, अशोक पाटील, शिवाजी वाळुंजकर उपस्थित होते.

सव्वा कोटीची उलाढाल

दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पशुबाजार बंद होता. त्यामुळे गुरांच्या खरेदी-विक्रीतून होणारी मोठी उलाढाल थंडावली होती. यंदा बाजार समितीमध्ये एक हजार १३२ गुरांची आवक झाली असून, त्यातील ७३८ गुरांची विक्री झाली आहे.

२११ पैकी १११ अश्‍वांची विक्री झाली आहे. पंजाब, सिंध, मारवाड, काठेवाड प्रांतातून उमदे अश्‍व दाखल असून, चांगल्या जातीचे बैलही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गुरांच्या खरेदी-विक्रीतून एकूण सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com