Turmeric Agrowon
ॲग्रो गाईड

Turmeric : आवळा बागेत हळदीचे आंतरपीक

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकेल अशी फळबाग व त्यात आंतरपीक अशी पद्धती विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात विविध फळपिकांखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.

 गोपाल हागे

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (PDKV) शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकेल अशी फळबाग (Orchard) व त्यात आंतरपीक अशी पद्धती (Inter cropping Method) विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात विविध फळपिकांखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने आवळा, आंबा, चिकू, सीताफळ आदींचा समावेश आहे. लागवडीनंतरचे पहिले चार ते पाच वर्षे समाधानकारक उत्पादन मिळतेच नाही.

बऱ्याच फळपिकांमध्ये प्रति वर्ष एकसारखे उत्पादन होतेच असे नाही. ही आनुवंशिक विकृती आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अन्य वार्षिक फळपिकांमध्ये आंतरपीक घेता येत नाही. कारण त्यांच्या सावलीत हंगामी पिकांचे उत्पादन मिळत नाही. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी विद्यापीठातील उद्यानविद्या विभागांतर्गत विविध फळपिकांमध्ये हळदीचे आंतरपीक (Turmeric Inter Cropping) घेण्याचे प्रयोग घेण्यात आले.

त्यामध्ये आवळा पिकात हळदीच्या तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयोगांचे निष्कर्ष उत्साहवर्धक मिळाले आहेत. दोन एकरांत राबविलेली ही पद्धती शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. हळदीची प्रयोगात निवड करण्यामागील कारण म्हणजे ते अर्धवट सावलीतही चांगले उत्पादन देते. यंदा सलग चौथ्या वर्षीही प्रयोगात सातत्य ठेवले आहे.

आवळा, हळद व पीकपद्धतीचे महत्त्व

आवळा हे भरपूर औषधी गुणधर्म असलेले फळपीक असून, त्याची मागणी व क्षेत्रही वाढलेले दिसून येते. त्याचबरोबर हळदीचे महत्त्व देखील औषधी गुणधर्मामुळे विशेषतः कोरोना काळानंतर वाढले आहे. या पीकपद्धतीत आवळा बागेचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येते. परिणामी, बागेचे आयुष्य वाढते. दोन्ही पिकांवर येणारे रोग- किडी एकमेकांस हानिकारक नाहीत. हळद आज परदेशात निर्यात होत आहे.

अजूनही निर्यातीस वाव आहे. म्हणजेच हे पीक परकीय चलन मिळवून देणारे आहे. आवळ्याचे उत्पादन वाढले तर त्याच्या निर्यातीसही वाव आहे. राज्यातील सर्व भागात या पीक पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. या प्रयोगातील निष्कर्ष यंदाच्या संयुक्त संशोधन शिफारस समितीमध्ये (ॲग्रेस्को) सादर करण्यात येणार आहेत.

प्रयोगात प्राध्यापक डॉ. विजय काळे (भाजीपाला शास्त्र विभाग), डॉ. एम. सोनकांबळे (विभाग प्रमुख- भाजीपाला शास्त्र), डॉ. शशांक भराड ( विभाग प्रमुख (फळबाग शास्त्र), डॉ. उज्ज्वल राऊत (सहयोगी प्राध्यापक (फळबाग शास्त्र) आदींचा सहभाग राहिला. उद्यानविद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई यांचे मार्गदर्शन लाभले.

वापरलेले लागवड तंत्र

-आवळ्याच्या एनए-७ व एनए-१० (नरेंद्र) या जातींची निवड

-हळदीचे आंतरपीक घेताना आवळ्याचे अंतर पाहून नियोजन हवे.

-साधारणतः आवळ्याचे शिफारशीतील अंतर हे ६ बाय ६ मीटर असते. आवळ्यातील दोन ओळींमध्ये लागवड करण्यासाठी गादीवाफे तयार करावे. दोन झाडांतील अंतर १८ फूट असल्यास आवळ्याच्या बुंध्यापासून ती फूट अंतर सोडून यामध्ये ६० ते ७० सेंमी रुंदीचे तीन उंच वरंबे तयार करावेत.

-ते तयार करण्यासाठी ६० ते ७० सेंमीचा माथा असलेले व ३० सेमी उंचीचे गादीवाफे (बेड) तयार

करावेत. बेडचा पाया १२० सेंमी आणि मधली नाली ३० सेंमी ठेवावी.

-गादीवाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत सेंद्रिय खते टाकणे आवश्यक.

बेड तयार करताना सर्व सेंद्रिय खते आपोआप बेडवर येतील.

-बेडवर तिफणीच्या साह्याने दिलेली रासायनिक खतांची मात्रा पेरून द्यावी. खते पेरताना आपोआप

बेडवर ३ ते ४ इंच खोलीच्या नाल्या पडतील.

-दोन ओळींतील अंतर ३० ते ४५ सेंमीपेक्षा जास्त नसेल याची काळजी घ्यावी. पाडलेल्या दोन ओळींमध्ये ३० सेमी अंतरावर लॅटरलच्या दोन्ही बाजूंस बेणे लावावे.

-हळद आंतरपीक म्हणून घेताना हेक्टरी १५ ते १६ क्विंटल बेण्याची आवश्यकता. पीडीकेव्ही वायगाव या वाणाची निवड या प्रयोगात केली. याचे कारण हा वाण कमी कालावधीत म्हणजे १८० दिवसांत काढणीस तयार होतो. यामुळे आवळा पिकास फेब्रुवारी- मार्चमध्ये फुलधारणेस आवश्‍यक असलेला ताण व्यवस्थित मिळतो.

-खत व्यवस्थापन- सेंद्रिय खते, १० टन शेणखत, तीन टन गांडूळ खत व दोन टन गांडूळ खत हेक्टरी.

-रासायनिक खतांमध्ये हेक्टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाशची शिफारस.

तसेच फेरस सल्फेट व झिंक सल्फेट प्रत्येकी १५ किलो लागवडीच्या वेळेस करावे.

उत्पादन

आवळ्यापासून प्रति झाड ४० किलो उत्पादन अपेक्षित धरले आहे. (१५० ते १८० क्विंटल प्रति हेक्टरी). चांगल्या व्यवस्थापनातून ८० किलो ते एक क्विंटलपर्यंत उत्पादनदेखील मिळू शकते. ओल्या हळदीचे हेक्टरी १४० ते १५० क्विंटल उत्पादन मिळू शकते. आवळ्याला किलोला २० रुपये, तर हळदीचा अपेक्षित दर क्विंटलला सहाहजार ते आठ हजार रुपये गृहीत धरता येतो.

शेतकरी प्रतिक्रिया

आवळा फळबागेत हळद आंतरपीक म्हणून कृषी विद्यापीठ प्रयोग घेत आहे. हे तंत्रज्ञान यशस्वी झाले तर फळबागायतदारांसाठी ते दिशादर्शक ठरू शकेल. सध्या फळबागांमध्ये झाडांच्या सावलीमुळे शेतकरी आंतरपीक घेत नाहीत. हळद येऊ शकते. परंतु यासाठी लागवड शक्यतो पूर्व-पश्‍चिम असणे गरजेचे वाटते. कारण यामुळे सूर्यप्रकाश आंतरपिकाला मिळेल. शिवाय फळबागेतील झाडांची लागवडसुद्धा विशिष्ट अंतरावर राहिली तर ते फायदेशीर होईल. लागवडीसाठी पूर्वनियोजन महत्त्वाचे वाटते.

-डॉ. गजानन ढवळे, हळद उत्पादक, शिरपूर जैन, जि. वाशीम

संपर्क ः डॉ. विजय काळे, ८२७५३११८५४

(भाजीपाला शास्त्र विभाग)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT