Groundnut Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

Groundnut Cultivation : या पद्धतीने करा उन्हाळी भुईमुगाची लागवड

महाराष्ट्रात तेलबिया पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यापैकी भुईमूग हे अत्यंत महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते.

Team Agrowon

महाराष्ट्रात तेलबिया पिकांची (Oil seed crop) मोठ्या प्रमाणात लागवड होते. त्यापैकी भुईमूग हे अत्यंत महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते.

खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामातील (Summer Season) भुईमुगाची उत्पादकता (Groundnut Cultivation) जास्त असते. जमिनीत पुरेसा ओलावा, भरपूर सूर्यप्रकाश, कोरडे हवामान या बाबी पिकाच्या वाढीस पोषक ठरतात. 

मध्यम,पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थ मिश्रित जमीन लागवडीस योग्य असते.

या प्रकारची जमीन नेहमी भुसभुशीत राहत असल्यामुळे हवा कायम खेळती राहते. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन आऱ्या सहजतेने जमिनीत जाण्यासाठी आणि शेंगा पोसण्यासाठी मदत होते.  

पूर्वमशागत करताना जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या २-३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी १० टन शेणखत जमिनीत मिसळावे. 

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाणांस थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम चोळावे.

बुरशीनाशकांच्या बीजप्रक्रियेनंतर रायझोबियम २५ ग्रॅम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे आणि नंतर पेरणीसाठी वापरावे. 

भुईमुगाची पेरणी १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी. पेरणीस उशीर होईल तशी उत्पादनात घट येते. 

पेरणीच्या ८ ते १० दिवस अगोदर शेंगा फोडून पेरणीसाठी बियाणे तयार करावे. पेरणीसाठी चांगल्या प्रतीचे बियाणे निवडावे. फुटके, कीडके, साल निघालेले, आकाराने लहान बी काढून टाकावे.

लागवडीसाठी टी.जी. २६, एस.बी.- ११, जे.एल.– ५०१, टी.ए.जी.२४ या जातीचे हेक्टरी १०० किलो बियाणे लागते.

फुले उन्नती, फुले उनप (जे.एल.- २८६), फुले भारती (जे.एल.- ७७६)- या जातीचे हेक्टरी १२०-१२५ किलो बियाणे लागते 

भुईमूग लागवड ही पेरणी आणि टोकण पद्धतीने करता येते. दोन ओळींतील अंतर ३० सेंमी आणि दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवून पेरणी करावी. उगवण झाल्यानंतर लगेच नांग्या भराव्यात. 

इक्रिसॅट पद्धतीने लागवड करण्यासाठी ट्रॅक्टर बेड यंत्राच्या साह्याने ९० सेंमी रुंदीचे वाफे तयार करून घ्यावेत. किंवा पूर्वमशागतीनंतर १.२ मीटर अंतरावर छोट्या नांगराच्या साह्याने ३० सेंमी रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात.

त्यामुळे ९० सेंमी रुंदीचे रुंद गादीवाफे तयार होतात.वाफ्याची रुंदी १५ ते २० सेंमी ठेवावी. रुंद वाफ्यावर दोन ओळींतील अंतर ३० सेंमी आणि दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवून टोकण पद्धतीने भुईमूग लागवड करावी.  

शेवटच्या कुळवणीच्या अगोदर हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.

पेरणीच्या वेळी नत्र २५ किलो आणि स्फुरद ५० किलो द्यावे. ही खतमात्रा युरिया किंवा सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून द्यावयाची झाल्यास, युरिया ५४ किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट ३१२.५ किलो द्यावी. 

सिंगल सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून स्फुरद दिल्यामुळे भुईमुगास आवश्यक असलेले कॅल्शिअम आणि गंधक ही अन्नद्रव्ये पिकास मिळतात.

अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतमात्रेसोबत ४०० किलो जिप्समचा वापर करावा. पेरणीवेळी २०० किलो जिप्सम आणि उर्वरीत मात्रा आऱ्या सुटताना द्यावी.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT