Bioflock Technology
Bioflock Technology  Agrowon
ॲग्रो गाईड

Bioflock Technology : मत्स्यपालनासाठी बायोफ्लॉक तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या बाबी

किरण वाघमारे, शुभम कोमरेवार

बायोफ्लॉक तंत्रज्ञानात (Bioflock Technology) संवर्धन होऊ शकणाऱ्या प्रजातींची निवड करावी. मत्स्यबीज सोडण्यापूर्वी टाक्या पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने निर्जंतुक करून घ्याव्यात. मत्स्यबीज संचयन करण्याअगोदर निर्जंतुक करून घ्यावे. मासळी हाताळण्याकरिता शक्यतो प्रत्येक टाकीकरीता वेगळे हॅन्ड नेट वापरावे किंवा प्रत्येक वेळी निर्जंतुक करून वापरावे. जेणेकरून संक्रमण टाळता येते.अमोनिया,ऑक्सिजन, सामू ,बायोफ्लॉक आणि तापमानाची नियमित तपासणी करावी.

बायोफ्लॉक पद्धतीची रचना सुधारित मत्स्यपालन करण्याच्या उद्देशाने करण्यात येते. बायोफ्लॉक प्रणाली अशा प्रजातींसाठी सर्वात योग्य आहे जी पाण्यात उच्च घनता एकाग्रता सहन करू शकते, सामान्यतः खराब पाण्याची गुणवत्ता सहन करू शकते. बायोफ्लॉकमध्ये उत्तम पोषणमूल्ये आढळतात. कोरड्या वजनाची प्रथिने २५-५० टक्के आणि फॅट प्रमाण श्रेणी ०.५-१५ टक्क्यांपर्यंत असते. हे जीवनसत्त्वे आणि खनिजे, विशेषतः फॉस्फरसचा एक चांगला स्रोत आहे. त्याचा प्रभाव प्रोबायोटिक्ससारखा असतो.

वाळलेल्या बायोफ्लॉकचा वापर मत्स्यखाद्यांमध्ये वापरले जाणारे फिशमिल किंवा सोयाबीनला पर्याय आहे. प्रत्येक फ्लॉक श्‍लेष्माच्या स्वरूपात एकत्र असतात जे सूक्ष्म जिवाणू व एकपेशीय सूक्ष्मजीव किंवा इलेक्टोस्टॅटिक आकर्षणामुळे तयार होतात. मोठे फ्लॉक्स उघड्या डोळ्यांनी पाहिले जाऊ शकतात, परंतु त्यापैकी बहुतेक सूक्ष्म असतात. फ्लॉक्सची आकार श्रेणी ५० - २०० मायक्रॉनपर्यंत असते.फ्लॉकच्या विकासासाठी दररोज कार्बन स्रोत मिसळणे आवश्यक आहे. दिलेल्या प्रत्येक १ किलो खाद्यासाठी (२५ टक्के क्रूड प्रोटीनसह), १०:१ चे कार्बन आणि नत्र गुणोत्तर राखण्यासाठी ६०० ग्रॅम कार्बन स्रोत प्रणालीमध्ये सोडावा. एकदा फ्लॉकची मात्रा १५-२० मिलिवर पोहोचली की कार्बन स्रोत मिसळण्याची गरज नाही. बायोफ्लॉक पद्धतीमध्ये सिंघी, मगूर, पाबडा,अनाबास/कोई,पंगासिअस, कॉमन कार्प, रोहू ,तिलापिया, मिल्क फिश, व्हन्नेमी आणि टायगर कोळंबीचे संवर्धन करता येते.

बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा वापर करताना ः
१) मत्स्यबीज खरेदी प्रमाणिकरण असलेल्या व खात्रीशीर मत्स्यबीज केंद्रातूनच खरेदी करावे.
२) बायोफ्लॉक तंत्रज्ञानात संवर्धन होऊ शकणाऱ्या प्रजातींची निवड करावी.
३) मत्स्यबीज सोडण्यापूर्वी टाक्या पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने निर्जंतुक करून घ्याव्यात.
४) मत्स्यबीज संचयन करण्याअगोदर निर्जंतुक करून घ्यावे.
५) टाकीतील पाण्याच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्यावे.
६) टाकीमध्ये शिफारशीत प्रमाणात मत्स्यबीज सोडावे.

७) आवश्यक असेल तेव्हा टाकीतील पाणी योग्य प्रमाणात बदलावे.
८) अमोनिया,ऑक्सिजन, सामू ,बायोफ्लॉक आणि तापमानाची नियमित तपासणी करावी.
९) मासळी हालचाल अनियमित तसेच शरीरावर जीवाणू, विषाणू,फंगस इत्यादी मुळे संसर्ग किंवा लक्षणे दिसत असल्यास तत्काळ मत्स्यव्यवसाय विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
१०) आजाराने संक्रमित झालेली मासळी टाकीतून तातडीने वेगळे करावी.
११) मासळी हाताळण्याकरिता शक्यतो प्रत्येक टाकीकरीता वेगळे हॅन्ड नेट वापरावे किंवा प्रत्येक वेळी निर्जंतुक करून वापरावे. जेणेकरून संक्रमण टाळता येते.

१२) प्रकल्पांवर पक्षी, कुत्री, मांजर यांचा प्रवेश टाळावा.
१३) टाकीत ब्लिचिंग पावडर टाकलेले पाणी वापरू नये.
१४) बाहेरील व्यक्तीस टाक्यांतील पाण्यात हात घालणे, धुणे किंवा मासळी सोबत खेळणे टाळावे.
१५) विद्युत पुरवठ्याची विशेष काळजी असावी. वीज नसल्यास बॅकअप (इन्वर्हटर, जनरेटर) ठेवावा.
१६) मत्स्य खाद्य उत्तम प्रतीचे तसेच बायोफ्लॉक लक्षात ठेऊन योग्य प्रमाणात द्यावे.
१७) प्रकल्प ठिकाणी हालचाल नोंदवही ठेवावी. प्रत्येक टाक्यांच्या
सर्व नोंदी नियमित ठेवाव्यात. जेणेकरून झालेल्या किंवा होणाऱ्या बाबीचा अंदाज बांधता येतो. पुढील काळात मत्स्य व्यवस्थापनातील चुका कमीत कमी होण्यास मदत होते.
१८) टाक्‍यांतील बदलण्यात येणारे पाणी शेती करिता उपयुक्त आहे.

संपर्क ः किरण वाघमारे, ९८८१६००९५१,
(सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT